स्‍थानिक टॅक्‍सी व्‍यावसायिकांना फटका:कारवाई करण्‍याची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

हरमल:विदेशी गाईडकडून पर्यटकांची लूट
गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक समस्या भेडसावत आहेत.सध्या विदेशी पर्यटक जे रशियन गाईड बनून ‘गोवा दर्शन’साठी कमिशनच्‍या आशेने पर्यटकांची लूट करीत आहेत.त्याचा फटका स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना बसत असल्याने संपूर्ण व्यवसायच धोक्यात आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.

हरमल:विदेशी गाईडकडून पर्यटकांची लूट
गोव्याचा पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर अनेक समस्या भेडसावत आहेत.सध्या विदेशी पर्यटक जे रशियन गाईड बनून ‘गोवा दर्शन’साठी कमिशनच्‍या आशेने पर्यटकांची लूट करीत आहेत.त्याचा फटका स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना बसत असल्याने संपूर्ण व्यवसायच धोक्यात आल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे.
दरम्यान, अलीकडे पर्यटनमंत्र्यांनी टॅक्सी चालक पर्यटकांना लुटीत असल्याचे विधान करून स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते.मात्र हा चालू असलेला प्रकार कोणाच्या मर्जीने चालू आहे,ह्याचा शोध घेण्याची मागणी एका टॅक्सी व्यावसायिकाने केली आहे.त्यांच्या ह्या कृतीमुळे टॅक्सी व्यावसायिकांचा धंदा बसला आहे.
पर्यटकांना विमानतळावरून इच्छितस्थळी आणून सोडणाऱ्या बसेस व मिनी बसेसना सरकारच्या पर्यटन विभागाने परवानगी दिली होती व आहे.त्यमुळे टॅक्सी व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे सरकारला टाहो फोडून सांगत होते.सध्या त्यांच्या परिस्थितीत एवढा फरक पडला की त्या बसेस अर्थात ट्रॅव्हल कंपनी,गोवा दर्शन ट्रिपसाठी पर्यटकांना आमिषे दाखवून स्थानिक टॅक्सी व बसेस ऑपरेटरना नुकसानीत ढकलल्याचे एका व्यावसायिकाने बोलून दाखविले.पर्यटक ज्या बसने विविध पर्यटन स्थळांवर उतरत असतात, त्यांच्याशी संधान साधून त्याना ‘गोवा साईड सीन’ ट्रीपसाठी मजबूर केले जाते.विदेशी गाईडकडून स्थानिक पर्यटक टॅक्सी विषयी हेतुपुरस्सर खोटी माहिती देत असल्याचे समजते.त्यामुळे टॅक्सी व्यावसायिक साफ बिथरले असून कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा असे त्यांचे म्हणणे आहे.
सदर ट्रॅव्हल कंपनी सुमारे ४० ते ५० डॉलर एका पर्यटकामागे वसूल करीत असून, त्यांना अवघी दोन पर्यटनस्‍थळे दाखवून फसवणूक करीत असल्याचा तक्रारी वाढल्या आहेत.स्थानिक टॅक्सी व्यावसायिक त्याच सहलीसाठी केवळ साडेतीन -चार हजार रुपये चार पर्यटकांना, म्हणजेच एक -दीड हजार रुपयांत पाच सहा पर्यटनस्‍थळे दाखवत आहेत,असे स्‍थानिक टॅक्सी व्यावसायिकाने प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. आम्ही टॅक्सी व्यावसायिक धनिक नसून बँकांकडून कर्जे घेत व्यवसाय थाटला आहे व त्यावरच कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहोत.याविषयी पोलिसांत तक्रार केल्यास काहीच फायदा होत नसल्याचे ते म्हणाले.
प्राप्त परिस्थितीत परप्रांतीय व सरकारी यंत्रणेस मलिदा देणाऱ्यांची कामे झटपट होत असल्याचा अनुभव गोमंतकीय व्यावसायिकांना नवीन नसल्याचे त्यानी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.स्थानिकांच्या पोटावर प्रत्येक बाबतीत पाय ठेवण्याचे प्रकार सरकारकडून होत असल्याने रस्त्यांवर उतरुनही फायदा नाही त्यापेक्षा आत्महत्या योग्य आहे का? असा सवाल एका टॅक्‍सी व्यावसायिकाने केला आहे.या गौडबंगाल प्रकरणाचा मांद्रेचे आमदार तथा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन दयानंद सोपटे यांनी लक्ष घालून पेडण्यातील टॅक्सी व्यवसायिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.

पत्रादेवी ते विर्नोडा महामार्गाचे काम बंद ठेवा

संबंधित बातम्या