टाळेबंदीत पोस्टमननी वाटले चार कोटी!

Dainik Gomantak
मंगळवार, 28 एप्रिल 2020

गोवा परीक्षेत्राने सादर केलेल्या अहवालात टाळेबंदीच्या काळात ‘किसान रथ' सेवेद्वारे रत्नागिरीतून हापूस आंबा मुंबईला वाहतूक केल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय गरजवंत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तसेच खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना पोषाख, दहा हजार मास्कचे वितरण करण्यात आले.
- वालराज के. (परीक्षेत्राचे साहायक पोस्टमास्तर)

पणजी :

टाळेबंदीच्या काळात ग्रामीण भागातील बँक खातेदारांना राज्याच्या टपाल खात्याने आर्थिक मदतीचा हात दिला आहे. या काळात टपाल खात्याच्या पोस्टमननी सुमारे ३.९५ कोटी रुपयांचे वाटप केले. आधार एनेबल पेमेंट सिस्टमच्या माध्यमातून ही रक्कम गरजूंना देण्यात आली आहे. त्याशिवाय टपाल खात्याच्या गोवा परीक्षेत्रात खात्याच्या बँकेने ३२९.३० कोटींचा व्यवहार केला.
गोवा परीक्षेत्रात राज्यातील दोन जिल्ह्यांसह महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सांगली अशा जिल्ह्यांचा समावेश होतो. नुकताच टपाल खात्याच्या देशातील परीक्षेत्रांचा टाळेबंदीच्या काळातील व्यवहाराची माहिती संबंधित राज्यांच्या मंत्रिमंडळाने सादर करण्यात आली. याशिवाय प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्फे २० हजार रुपयांचे जीवनावश्‍यक रोजंदारीवरील मजुरांना देण्यात आले आहे. त्याचबरोबर गोवा टपाल क्षेत्राच्यावतीने रक्तदान शिबिरही घेतले. टपाल खात्याच्या रत्नागिरीतील कर्मचाऱ्यांनी ५० हजार रुपये अनाथाश्रमाला दिले आहेत.

असे झाले वितरण...
टाळेबंदीच्या काळात टपाल खात्याच्या आधार एनेबल पेमेंट सिस्टमचा ग्रामीण भागातील लोकांनी अधिक लाभ घेतला. घराबाहेर पडता येत नसल्याने पोस्टमनला देण्यात येत असलेल्या रकमेतून एका अंगठ्याच्या ठशावर लोकांना सहज पैसे मिळतात. टाळेबंदीच्या काळात या परीक्षेत्रात ३.९५ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यामुळे अनेकांना या पैशाचा बंदीच्या काळात विनियोग करता आल्याचे वालराज के. यांनी सांगितले.

गोवा परीक्षेत्राने सादर केलेल्या अहवालात टाळेबंदीच्या काळात ‘किसान रथ' सेवेद्वारे रत्नागिरीतून हापूस आंबा मुंबईला वाहतूक केल्याची माहिती दिली आहे. त्याशिवाय गरजवंत कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तसेच खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना पोषाख, दहा हजार मास्कचे वितरण करण्यात आले.
- वालराज के. (परीक्षेत्राचे साहायक पोस्टमास्तर)

टपाल खात्याची सेवा झालेले व्यवहार आर्थिक व्यवहाराची रक्कम
आधार एनेबल पेमेंट सिस्टम २१,१८५ ३.९५ कोटी
पोस्ट ऑफीस सेव्हिंग बँक १८,६९,७२५ ३२९.३० कोटी
इंडियन पोस्ट पेमेंट बँक ३४,८७७ ७.०९ कोटी
एटीएमचा वापर ४,१९७ २.०३ कोटी

संबंधित बातम्या