‘लॉकडाऊन’मध्ये १९३ मद्य दुकाने सील

dainik gomantak
गुरुवार, 30 एप्रिल 2020
‘लॉकडाऊन’मध्ये १९३ मद्य दुकाने सील

पणजी

 राज्यात लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीला बंदी असूनही काही भागात चोरमार्गाने विक्री केली जात होती. अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी या काळात ठिकाणी छापे टाकून केलेल्या कारवाईत आतापर्यंत १९३ मद्यालयांचे परवाने निलंबित करून सील करण्यात आली आहेत. बहुतेक प्रकरणे पेडणे तालुक्यात नोंद झाली आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
अबकारी खात्याने केलेल्या कारवाईत किरकोळ मद्य विक्रेते तसेच घाऊक विक्रेते यांचाही समावेश आहे. लॉकडाऊन काळात मद्य विक्री
काही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून सुरू केली होती. घाऊक विक्रेत्यांनी त्यांच्या गोदामातून काही माल काढून विक्री केली जात असल्याची माहिती अबकारी खात्याला मिळाली होती. त्यानुसार गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांनी गोदामांवरच छापे टाकून मोठ्या प्रमाणात मद्य तसेच गोदामे जप्त केली आहेत. ज्या भागातून मद्य दुकाने खुली ठेवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये पेडण्यात सर्वाधिक प्रकरणे नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ सालसेत, सत्तरी व बार्देश या तालुक्यांचा क्रमांक लागतो.

 

 

 

संबंधित बातम्या

Tags