जुनेगोवे चर्चच्या नुकसानीची पाहणी

Dainik Gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

कंत्राटदार औरंगाबादला गेला असून त्याला तातडीने बोलावण्यात आले आहे.

पणजी

अवकाळी पावसामुळे जुने गोवे येथील बासलिका ऑफ बॉम जिजस चर्चचे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज पाहणी केली. चर्चच्या दुरुस्ती कामासाठी कामगार, सामुग्री व अन्य मदतीचे नाईक यांनी आश्वासन दिले. भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक अमरनाथ रामकृष्ण यांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हे दुरूस्तीचे काम पूर्ण केले जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
चर्चचे फादर, व सरकारी अधिकाऱ्यांसोबत नुकसानची पाहणी केल्यानंतर नाईक म्हणाले, की दुरुस्ती कामासाठी आम्ही सुरवात केली असून, संबंधित कंत्राटदारला एक दिवस ही वाया न घालवला जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे. कोरोना मुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कामगार, साहित्य मिळणे कठीण झाले आहे. कंत्राटदार औरंगाबादला गेला असून त्याला तातडीने बोलावण्यात आले आहे. जानेवारीमध्ये हे दुरुस्तीचे काम सुरु झाले होते, पण टाळेबंदीमुळे त्यात खंड पडला आहे. आता १० -१२ दिवसात काम पूर्ण करण्यास सांगितले आहे.
अधीक्षकनी माहितीला दुजोरा देताना सांगितले की, हे काम मे महिनाभरत पूर्ण करायचे होते. मात्र २० रोजी अचानक पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यामुळे लाकडाला वाळवी लागू नये, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

संबंधित बातम्या