पर्वरीत ८ रोजी माडाचे फेस्‍त

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

‘माडाचे फेस्त’ हा असाच एक पारंपरिक सण असून याद्वारे लोकांना माडाचे महत्त्‍व तसेच त्याचे वेगवेगळे उपयोग पटवून देणे हा या फेस्तमागचा प्रमुख हेतू आहे, अशी माहिती संजय स्कूलच्या सदस्य सचिव शेरू शिरोडकर यांनी दिली.

पर्वरी : गोव्यातील पारंपरिक सणांना उजाळा देण्यासाठी आणि येणाऱ्या पिढीला या सणांचे महत्त्‍व समजण्यासाठी वेगवेगळे पारंपरिक सण वेगवेगळ्या ठिकाणी साजरे करीत असतो.
पत्रकार परिषदेस मुख्याध्‍यापक तातू कुडाळकर, मायलीन गोन्सावीस, मारियान फर्नांडिस,प्रकाश कामत उपस्थित होते.

माडाचे फेस्त ता. ८ रोजी सकाळी १० वाजता येथील संजय स्कूल मध्ये होणार आहे. या माडाच्या फेस्ताची सुरवात ‘पासय माडांनी’ याने होणार आहे. ही मिरवणूक पोलिस स्थानकापासून सुरवात होऊन सेवा रस्ता, आझाद भवन करत संजय स्कूलमध्ये समारोप होणार आहे. या मिरवणुकीत पोलिस बेंड आणि संजय स्कूलच्या मुलांचे बेंडसह पालक, शिक्षक व मुले सहभागी होणार आहेत. त्यानंतर शेतकी खात्याचा एक कर्मचारी मशिनच्या सहायाने माडावर चढण्याचे प्रात्यक्षिक दाखविणार आहे. वास्को, कुडचडे येथील संजय स्‍कूलमधील मुले, कला अकादमी, आनंद निकेतन यातील मुले सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार आहेत.

मातीकाम, पेंटिंग यांची प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत. घुमट वादन, माडाच्या पानापासून टोपी बनविणे, शिंपल्या, क्राफ्ट यांची कार्यशाळा होणार आहे. संजय स्‍कूलमधील खास मुले आपली कला सादर करणार आहे. तसेच गोव्यातील पारंपरिक खेळ तसेच खवय्यांसाठी खास खाण्याचे स्‍टॉल लावण्यात येणार आहेत. त्यात खास करून गोव्यातील पारंपरिक खाद्यपदार्थ ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर सांगितिक कार्यक्रम सादर होणार
आहे. तसेच संजय स्कूलच्या चार मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिलाई मशिन देण्यात येणार आहे, अशी माहिती सदस्य सचिव शिरोडकर यांनी दिली.या अनोख्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

खोट्या आरोपांद्वारे दबावाचे जुनेच डावपेच भाजपच्या आरोपावर खंवटेंची प्रतिक्रिया

संबंधित बातम्या