महाशिवरात्रीनिमित्त पणजीत मॅजिक ऑफ मॅडिटेशन

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्‍व विद्यालयातर्फे
आजपासून पणजीत भरगच्च कार्यक्रम

कार्यक्रमाचे उद्‌घाटन २० रोजी संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते होईल, अशी माहिती ब्रम्हाकुमारी शोभा बी. के. यांनी पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत खुला असून अधिकाधिक लोकांनी कार्यक्रमाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

पणजी : प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे महाशिवरात्रीनिमित्त २० ते २६ फेब्रुवारीपर्यंत पणजीतील दयानंद बांदोडकर मैदानावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगाला मोठ्या प्रमाणात सतावणारी डिप्रेशनसारखी समस्‍या यावर्षीचा मुख्‍य विषय असणार आहे.

उद्‌घाटनप्रसंगी उपसभापती इजिदोर फर्नांडिस, मंत्री मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, आतानासिओ मोन्सेरात व अन्य उपस्थित असतील. डिप्रेशनची समस्या आजच्या युगात प्रत्येक वयोगटाला लागू होते. त्यामुळे या समस्येवर सात दिवशीय कार्यक्रमात उपाय, माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमाच्या उद्‌घाटनानंतर क्लिनिकल रिसर्च मुंबई येथील डॉ. सचिन परब ‘सिक्रेट ऑफ अल्टीमेट लिव्हिंग’ या विषयावर मार्गदर्शन करतील.

कार्यक्रमात २१ रोजी सकाळी ७ वाजता डॉ. सचिन परब ध्यान सत्र घेतील. संध्याकाळी ६ वाजता ‘आर्ट ऑफ बिइंग पॉझिटिव्ह’ या विषयावरही ते मार्गदर्शन करतील. २२ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता मुंबई येथील इंटरनॅशनल ट्रेनर अ‍ॅण्ड ऑथरचे सायकोथेरपीस्ट डॉ. गिरीष पटेल हे डिप्रेशनवर उपाय व काळजी घेण्यासंदर्भात, तर २३ रोजी ते सकाळच्या सत्रात उपस्थितांसाठी ध्यान सत्र घेतील. संध्याकाळच्या सत्रात ‘मॅजिक ऑफ मॅडिटेशन’ या विषयावरही ते मार्गदर्शन करतील. २४ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता पुण्यातील वरिष्ठ ध्यान शिक्षिका बी. के. सरिता राठी या ‘क्रिएटिंग मिरॅकल्स इन लाइफ’ या विषयावर बोलतील. तसेच २५ रोजी त्‍या ‘रिसिव्हींग गॉड्स पावर’ व २६ रोजी ‘एट पावर्स ऑफ सक्सेस’ या विषयावर मार्गदर्शन करतील, असेही शोभा यांनी सांगितले.

बांदोडकर मैदानावर राजयोग मेडिटेशनचे विविध स्टॉल्स देखील उभारण्यात येणार आहेत. यात व्यसनमुक्ती, योगिक शेती, आहारविषयी माहिती देण्यात येईल. तसेच मैदानावर लोकांना १०८ शिवलिंगांचे दर्शनही घेता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

फोटो फीचर