गोवा बनावटीची दारू जप्त; मुंबई-गोवा हावेवर सर्वात मोठी कारवाई

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्‍यातील वाटूळ मधील ओव्हर ब्रिजवर केलेल्या कारवाईत एका कंटेनरमधून गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला.

लांजा : लांजा राज्य उत्पादन शुल्क विभागाने राजापूर तालुक्‍यातील वाटूळ मधील ओव्हर ब्रिजवर केलेल्या कारवाईत एका कंटेनरमधून गोवा बनावटीचा दारूसाठा जप्त करण्यात आला. बुधवारी सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर केलेल्या या कारवाईत तब्बल 1 कोटी 72 लाख 85 हजार रुपयांचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.(1 crore 72 lakh 85 thousand rupees worth of Goa made liquor seized on Mumbai Goa highway)

कंटेनरमधून गोवा बनावटीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती लांजातील उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार बुधवारी रत्नागिरी विभाग अधीक्षक डी. बी. एच. तडवी यांच्या नेतृत्वाखाली लांजा येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही मोठी कारवाई केली. बुधवारी कंटेनर (एमएच 12 एलटी- 7835) संशयास्पदरित्या आढळल्यानंतर कंटेनर थांबविण्यात आला. तपासणी केली असता, हा पूर्ण कंटेनर गोवा बनावटीच्या दारूने भरलेला सापडला.

24 तासात 1000 मृत्यू; उद्धव ठाकरे आज घेणार महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होणार? 

या कंटेनरमध्ये रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 180 मिलीच्या एका बॉक्‍समध्ये 48 याप्रमाणे अठराशे बॉक्‍समध्ये 86 हजार 400 सीलबंद बाटल्या सापडल्या. ज्याची एकूण अंदाजे किंमत 1 कोटी 29 लाख 60 हजार रुपये असेल. त्याचप्रमाणे रॉयल ब्ल्यू माल्ट व्हिस्कीच्या 750 मिलीच्या एका बॉक्‍समध्ये सापडलेल्या चारशे बॉक्‍समध्ये 4800 सीलबंद बाटल्याही जप्त केल्या गेल्या. ज्याची  किंमत 31 लाख 20 हजार रुपये होती. या दारू वाहतुकीसाठी वापरलेल्या कंटेनरची किंमत सुमारे बारा लाख रुपये आहे तर त्याचबरोबर पाच हजार रुपये किमतीचा मोबाइलही कंटेनर च्या चालकाकडे सापडल्याने एकूण एक कोटी 72 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. दरम्यान ट्रकचालक मोहम्मद अब्दुल इझाक वय वर्ष 47(अहमदनगर शिरवा गुलु ) आणि मोहम्मद फरहान (कासारागोड, केरळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरची लांजा-राजापूर तालुक्‍यात झालेली  ही सर्वात मोठी कारवाई  आहे. ज्यात 1 कोटी 72 लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या