मुंबईत कोरोनाचे 1383 नवीन रुग्ण

Dainik Gomantak
रविवार, 14 जून 2020

69 बाधितांचा मृत्यू; मृतांचा आकडा दोन हजारांवर

मुंबई

मुंबईमध्ये कोरोनाचे 1383 नवीन रुग्ण सापडल्यामुळे बाधितांची संख्या 56 हजार 740 वर गेली आहे. त्याचप्रमाणे 69 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 2111 वर पोहोचला आहे.
मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होत असून, 47 पुरुष आणि 22 महिला अशा आणखी 69 जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी 47 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमधील सात रुग्ण 40 वर्षांखालील, 37 रुग्ण 60 वर्षांवरील आणि 25 रुग्ण 40 ते 60 वर्षे वयोगटातील होते. आणखी 788 संशयित रुग्ण सापडल्यामुळे संशयित कोरोना रुग्णांची संख्या 40 हजार 776 वर गेली. बऱ्या झालेल्या 795 रुग्णांना घरी सोडण्यात आल्यामुळे मुंबईतील कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या 25 हजार 947 झाली आहे.

अंधेरी-जोगेश्‍वरीत वाढते प्रमाण
मुंबईत अंधेरी, जोगेश्‍वरी भागात कोव्हिडचे सर्वाधिक रुग्ण असून उपनगरे हाय अलर्टवर आहेत. अंधेरी, जोगेश्‍वरी पूर्व या के पूर्व विभागात मुंबईतील आतापर्यंतचे सर्वाधिक म्हणजे 3782 रुग्ण आढळले. जी उत्तर म्हणजे दादर, माहीम, धारावीत 3729 रुग्ण आढळले आहेत.

संबंधित बातम्या