मुंबईत 14,691 वाहने जप्त

Dainik Gomantak
मंगळवार, 30 जून 2020

पोलिसांची धडक कारवाई; 180 ठिकाणी नाकाबंदी

मुंबई

वेगवेगळी पोलिस ठाणी व वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सोमवारीही सुरू ठेवत 14 हजार 691 वाहने जप्त केली. त्यांतील 8611 वाहने वाहतूक पोलिस विभाग आणि 6080 वाहने वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांनी केलेल्या नाकाबंदीत जप्त करण्यात आली आहेत.
लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यांवर वाहने उतरवणाऱ्यांवर सोमवारीही विशेष मोहीम चालवण्यात आली. त्याअंतर्गत मुंबईतील 180 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनीही मुंबईत विशेष मोहीम राबवली. अत्यावश्‍यक कारण नसतानाही वाहने बाहेर काढणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली. एकूण 474 तीनचाकी, 295 टॅक्‍सी, 1601 कार व 6241 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली.

परिसर जप्त वाहने
कुलाबा-मरिन ड्राईव्ह 875
गिरगाव 654
नागपाडा-वरळी 392
दादर-धारावी 159
दादर पूर्व-माटुंगा-परळ 430
चेंबूर-मानखुर्द 1138
घाटकोपर-मुलुंड 1823
सांताक्रूझ-वाकोला 187
वांद्रे पश्‍चिम-सांताक्रूझ 582
अंधेरी 461
बोरिवली 389
दहिसर 418
 

संबंधित बातम्या