16 वर्षीय प्रथमेशने कॅमेरातून कैद केला 'चांद का रोशन चेहरा'

16 year old boy Prathamesh Jaju clicking one of the clearest picture of moon
16 year old boy Prathamesh Jaju clicking one of the clearest picture of moon

पुणे: पुण्यातील(Pune) 16 वर्षीय प्रथमेश जाजूने (Prathamesh Jaju) 50 हजार फोटोंना(Photo) एकत्र जोडून चंद्राचा एक मोठा पॅनोरोमा तयार केला आहे. याची खासियत म्हणजे जास्तीत जास्त झूम करूनही, या चित्राचे पिक्सल फाटत नाहीत. प्रथमेशचे हे चित्र आता सोशल मीडियाच्या मथळ्यांमध्ये व्हायरल होत आहे. पृथ्वीवरून क्लिक केल्या गेलेल्या चंद्राचा हा सर्वात स्पष्ट फोटो असल्याचे प्रथमेशचा दावा आहे.(16 year old boy Prathamesh Jaju clicking one of the clearest picture of moon)

50 हजार छायाचित्रांमधून बनविलेले भव्य चित्र 

खगोलशास्त्र प्रेमी प्रथमेश सांगतो की, "वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून 38 व्हिडिओंमधून 50 हजार फोटो काढून त्याने हे भव्य चित्र तयार केले आहे. प्रथमेशच्या स्पेशल कॅमेर्‍याने शूट केलेल्या 38 व्हिडिओंचा एकूण डेटा 186 जीबी होता. प्रत्येक व्हिडिओने 1 ते दीड मिनिटांदरम्यान 2 हजारांहून अधिक फ्रेम कॅप्चर केल्या." नुकताच दहावीपास झालेला 16 वर्षाच्या हौशी खगोलनिरीक्षक प्रथमेश जाजू याने ही अप्रतिम त्रिमितीय दिसणारी प्रतिमा साकारली आहे. त्यासाठी त्याने चंद्राचे छोटे छोटे आणि स्पष्ट 50 हजार फोटो काढून ते जोडले आहे.

प्रथमेश म्हणाला, 'मी 3 मे रोजी रात्री एक वाजता हे फोटों क्लिक करण्यास सुरुवात केली आणि सकाळी साडेपाचपर्यंत हे फोटो क्लिक करत राहिलो. त्यांच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मला सुमारे 72 तास लागले. पॅनोरामा फोटो फोनवर घेतले जातात. त्यानंतर मी चंद्राच्या पॅनोरामा व्हिडिओंवर क्लिक केले आणि नंतर त्यांना एकत्र जोडले. चंद्रावर खनिजे असतात आणि प्रत्येक खनिजांचा रंग वेगळा असतो, आपले डोळे ते पाहू शकत नाहीत, परंतु माझा कॅमेरा ते करू शकतो. प्रथमेशने आपल्या इंस्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहे. प्रथमेश जाजू हौशी खगोलशास्त्रज्ञ आहे सध्या त्याचे हे चित्र सोशल मीडियावर चर्चेत आहे.

कसे मिळविले फोटो

  • 2018 मध्ये चंद्राचे फोटो घेण्यास सुरुवात केली

  • चंद्राच्या छोट छोट्या भागाचे 38 व्हिडीओ काढले

  • त्यात 60 हजार पेक्षा जास्त फोटो मिळवले

  • निवडक 50 हजार फोटोंना जोडत एक पूर्ण छायाचित्र तयार केले

काय आहे फोटोमध्ये?

  • कितीही झूम केले तरी फोटो स्पष्टच दिसणार

  • चंद्राच्या तपकिरी आणि निळ्या-राखाडी छटा क्लियर दिसतात

  • या रंगांमधून चंद्रावरील खनिजांची माहिती मिळते.

छायाचित्रणासाठी वापरले साहित्य :

  • 1,500 mm वर 38 पॅनेल आणि 3,000 mm फोकल लांबी 1.2 मेगापिक्सेल ZWO ASI120MC-S हा अस्ट्रोनॉमी कॅमेरा

  • सेलेस्ट्रॉन 5 कॅसग्रीन ऑप्टिकल ट्यूब असेंबली टेलिस्कोप

''चंद्राबरोबरच मी आपल्या सूर्यमालेतील सर्वच ग्रहांचे फोचो काढले आहे. येत्या काळात सुर्यावरील सौरडागांचे फोटो काढण्याचा माझा विचार आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन खगोलशास्रातच करियर करण्याचा माझा विचार आहे.''

- प्रथमेश जाजू, हौशी खगोलनिरीक्षक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com