महाराष्ट्रात २४ तासांत १६०२ नवीन रुग्ण

Dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

राज्यात आतापर्यंत एकूण 6059 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

मुंबई

राज्यात 24 तासांत कोव्हिड-19 च्या तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27,524 झाली आहे. आणखी 44 रुग्ण दगावल्यामुळे मृतांचा आकडा 1019 वर गेला आहे.गुरुवारी 512 कोरोनामुक्त रुग्णांना घरी पाठवण्यात आले; राज्यात आतापर्यंत एकूण 6059 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.
मुंबईत 25, नवी मुंबईत 10, पुण्यात 5, औरंगाबाद शहरात 2 आणिपनवेल व कल्याण-डोंबिवलीत प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. नवी मुंबईत 14 एप्रिल ते 14 मे या कालावधीत दगावलेल्या रुग्णांची माहिती गुरुवारी देण्यात आली. या 44 मृतांमध्ये 31 पुरुष आणि 13 महिलांचा समावेश आहे. त्यापैकी 21 रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 20 रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 3 जण 40 वर्षांखालील होते. या 44 रुग्णांमधील 34 जणांना (77 टक्के)मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, असे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1019 वर पोहोचली आहे.

आतापर्यंत महत्त्वाचे
थ्रोट स्वॅब तपासणी : 2,40,145
निगेटिव्ह : 2,12,621
पॉझिटिव्ह : 27,524
क्‍लस्टर कंटेनमेंट झोन : 1512
सर्वेक्षण पथके : 14,253
लोकसंख्येचे सर्वेक्षण : 59.04लाख
एकूण कोरोनामुक्त : 6059
होम क्वारंटाईन : 3,15,686
संस्थात्मक क्वारंटाईन : 15,465

संबंधित बातम्या