कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 2 आठवड्यांचा कडक लॉकडाऊन गरजेचाच : कोविड टास्क फोर्स 

uddhav thackeray.jpg
uddhav thackeray.jpg

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्सशी महत्त्वाची बैठक आज  पार पडली. या बैठकीत कोविड टास्क फोर्स महाराष्ट्रातील कोरोना संक्रमणाच्या अनियंत्रित परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  8 दिवसांच्या  कडक लॉकडाउनच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. तर महाराष्ट्रातील कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी 14 दिवसांचे कठोर लॉकडाउन आवश्यक असल्याचे मत टास्क फोर्समधील काही सदस्यांनी व्यक्त केले आहे.  तथापि,  महाराष्ट्रातील कोरोना साखळी खंडित करण्यासाठी उद्धव ठाकरे आज महाराष्ट्रातील लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.  (2 weeks of strict lockdown needed to break corona chain: Covid Task Force) 

टास्क फोर्स बैठकीत तज्ज्ञांनी  राज्यातील बेडची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता आणि व्हेंटिलेटरसंदर्भातील चिंताही उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्याची आणि रेमेडीसीवीर औषधाची उपलब्धता हा विषयही ठळकपणे अधोरेखित करण्यात आला आहे.  तत्पूर्वी, महाराष्ट्रात रात्रीच्या वेळी  कर्फ्यू आणि शनिवार व रविवार कडक  लॉकडाउननंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनीदेखील आता पूढील काही दिवसांसाठी कडक लॉकदाऊनचे संकेत दिले आहेत. कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकार १२ एप्रिलपासून पुढील 15 दिवस लॉकडाउन लावू शकते. सत्ताधारी महाविकास आघाडीतिल तीन पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या प्रतिनिधींच्या बैठकीत राज्य सरकार जो निर्णय घेऊल त्या निर्णयासाठी त्यांनी सर्व पक्षांचे सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित प्रत्येकाने त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले.

तथापि, या लॉकडाऊन दरम्यान, राज्यातील जनतेची नोकरीची हमी आणि रोजीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसरकारने एक योजना आखावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी केली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारला आमचा पाठिंबा देण्यासाठी आणि लॉकडाऊनने बाधित सर्व पक्षांपर्यंत पोहोचण्यास तयार आहोत. मात्र नागरिकांच्या आर्थिक चिंता फेटाळून लावता येणार नाहीत. लॉकदाऊनच्या विचारानेच नागरिकांमध्ये अशांतता पसरली आहे. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटी आणि व्यवसायातील समस्यांशी संबंधित एक प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, यासाठी त्यांना पर्याय देणे आवश्यक असल्याचे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com