Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटाचे 22 आमदार नाराज, भाजपात प्रवेश करणार असल्याचा 'सामना'चा दावा

सत्तांतर होऊन तीन महिने उलटले असताना एकनाथ शिंदे गटाचे 22 आमदार नाराज असल्याचा दावा सामना मधून करण्यात आला आहे
Eknath shinde | Maharashtra Politics
Eknath shinde | Maharashtra PoliticsDainik Gomantak

महाराष्ट्रातील राजकीय हालचाली काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. शिवसेनेत उभी फूट पडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. त्यात उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी (CM Eknath Shinde) विराजमान झाले. सत्तांतर होऊन तीन महिने उलटले असताना एकनाथ शिंदे गटाचे 22 आमदार नाराज असल्याचा दावा सामना मधून करण्यात आला आहे. लवकरच हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत असा दावा सामना वृत्तपत्रातील (Saamna Newspaper) रोखठोकमधून करण्यात आला आहे.

Eknath shinde | Maharashtra Politics
Maharashtra: वर्षभरात 75 हजार युवकांना सरकारी नोकरी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा

काय म्हटलं आहे 'सामना'च्या रोखठोकमध्ये

"एकनाथ शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजपा स्वत:चे राजकारण करत राहील. भाजपाचे नेते सरळ सांगतात, शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत दिसतील. असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात शिंदेंचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. देशाच्या राजधानीत शिंदेंचा प्रभाव नाही. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते."

Eknath shinde | Maharashtra Politics
Maharashtra: अमरावतीजवळ मालगाडीच्या 20 वॅगन्स रुळावरून घसरल्या, अनेक गाड्यांचा बदलला मार्ग

दरम्यान, सामनातील या खळबळजनक दाव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आले आहे. खरंच शिंदे गटाचे आमदार नाराज आहेत का याबाबत आता उलटसुलट चर्चा केल्या जात आहेत. तसेच, शिंदे गट किंवा भाजपकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे समोर आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com