राजेंचा इतिहास जगाला कळणार; शिवनेरी किल्ल्याचा विकास होणार

 23 crore sanctioned for Shivneri fort Tourism Minister Aditya Thackeray
23 crore sanctioned for Shivneri fort Tourism Minister Aditya Thackeray

मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालूक्यातील  शिवनेरी किल्ल्याचे जतन-संवर्धन, सुशोभिकरण आणि या किल्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 23 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहीती राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. या निधीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. राज्यातील गडकिल्ल्यांच्या पर्यटनाला आणि विकासाला चालना देण्यासाठी ही महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नसुन संपूर्ण जगाला प्रेरणा देणारे आहे. त्यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यां किल्ल्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हा पुढाकार घेतला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्यांचा समृद्ध ठेवा असलेल्या या गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि त्यांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे सौभाग्य लाभणे देखील भाग्यच आहे आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे पर्यवरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पुरातत्व विभाग, वन विभाग आणि विविध कामे या निधितून केली जाणार आहेत. यामध्ये पाथवेंची सुधारणा, रॉककट गुंफांचे नूतनिकरण,  अंबरखाना, राजवाडा आणि त्याला जोडून असलेल्या भागाचे नूतनिकरण, पर्यटकांसाठी सोयी-सुविधा, दिशादर्शकं आणि मार्गदर्शक चिन्हे, बागकाम, शिवनेरी प्रदक्षिणा मार्गाची सुधारणा, वरसुबाई मंदिर ते पद्मावती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सुधारणा, शिरोली बु. ते तेजेवाडी रस्त्याची सुधारणा अशा विविध रस्त्यांची सुधारणा या निधितून केली जाणार आहे, शिवसंकुल येथे इको टुरीजमची कामे, अप्पर पाथवेसाठी गॅबियन वॉल, बागेसाठी

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि या निधिच्या मंजुरीसाठी बैठका घेऊन वेळोवेळी पाठपुरावा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. शिवनेरीप्रमाणेच राज्यातील सर्व गडकिल्ल्यांचा त्यां क्ल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व राखून पर्यटनदृष्ट्या विकास केला जाईल. या निमित्ताने भविष्यात शिवरायांच्या कार्याची माहिती जगातील पर्यटक आणि अभ्यासकांपर्यंत पोहचविण्याचे काम पर्यटन विभागामार्फत केले जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com