महाराष्ट्रात दिवसभरात 28 हजार नवे कोरोनारुग्ण

corona.jpg
corona.jpg

दिवसेंदिवस महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने परिस्थिती पुन्हा चिंताजनक होताना दिसते आहे. राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आकड्याने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. राज्यात आज 28 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि दुर्दैवाने 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन लोकांना सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.(28000 new corona patients in Maharashtra in last 24 hour)

कोरोना विषाणूचे संक्रमण (Corona virus) आटोक्यात आणण्यासाठी मागच्या वर्षभरात राज्यातील आरोग्य व्यवस्था, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच यंत्रणांनी तारेवरची कसरत केली. परिणामी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात सुद्धा आली होती. मात्र आता कोरोनाने पुन्हा  डोके वर काढल्याचे दिसून येते आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार मागच्या 24 तासात राज्यात 28,699 रुग्ण समोर आले आहेत. राज्याच्या कोरोना रुग्णांची संख्या 25,33,026 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 22,47,495 पेक्षा जास्त लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात आज पर्यंत 53,589 लोकांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. तर सध्या कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये 2,30,641 लोक  उपचार घेत आहेत. 

दरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून इतर शहरांत देखील रुग्ण वाढत जाताना दिसत आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला असून परभणी(Parbhani) शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com