Maharashtra Crime News: फटाके फोडण्यापासून रोखल्याने 3 मुलांनी केली एकाची हत्या

गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 14 आणि 15 वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर अन्य 12 वर्षीय आरोपी फरार आहे.
Goa Murder News
Goa Murder NewsDainik Gomantak

मुंबई: सोमवारी मुंबईच्या पूर्व उपनगरातील गोवंडी येथील एका मैदानात काचेच्या बाटलीतील फटाके फोडण्यापासून रोखल्यानंतर एका 21 वर्षीय तरुणावर तीन तरुणांनी हल्ला करून त्याची हत्या केली. अशी माहिती पोलिसांनी दिली.

(3 boys killed one by stopping them from bursting crackers)

Goa Murder News
Mumbai Murder Case: मुंबईत 'बघण्यावरून मारामारी, 3 जणांनी मिळून केला एकाचा खून

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिसांनी 14 आणि 15 वर्षांच्या दोन मुलांना ताब्यात घेतले आहे, तर अन्य 12 वर्षीय आरोपी फरार आहे. गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात दुपारी ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, पीडिताने 12 वर्षांच्या मुलाला काचेच्या बाटलीत फटाके टाकताना पाहिले आणि त्याला थांबवले. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि अन्य दोन आरोपींनी पीडिताला मारहाण सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, 12 वर्षांच्या मुलाने त्या व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्याच्या मानेवर वार केले. जखमी व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com