रत्नागिरी जिल्ह्यातील 30 धरण ओव्हरफ्लो

 रत्नागिरी जिल्ह्यातील 30 धरण ओव्हरफ्लो
30 dams overflow in Ratnagiri district

रत्नागिरी - महाराष्ट्रातील रत्नागिरीत  जिल्ह्यात  (Ratnagiri district) चांगलाच पाऊस पडत आहे. येथील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याच बरोबर धरण (dams) असलेल्या भागात देखील चांगलाच पाऊस पडला आहे.  त्यामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. (30 dams overflow in Ratnagiri district)

रत्नागिरी जिल्ह्यातील 46 धरण प्रकल्पापैकी 30 धरणं 100 टक्के भरली असून उर्वरीत 16 धरणं ही 50 टक्क्यांपेक्षा अधिक क्षमतेने भरली आहेत. मंडणगड 2 , दापोली 3 , खेड - 6 , गुहागर 1, चिपळूण 7 , संगमेश्वर 4 , लांजा 3 , राजापूर 3 तर रत्नागिरीतील 1 धरण  100 टक्के भरले आहे. 

दरम्यान यंदा महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भात चांगल्या पावसाचा अंदाज असला तरी महाराष्ट्र मॉन्सून दाखल झाल्यापसून मरावाडा, मध्य महाराष्ट्रात अद्याप पाऊस झालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग आणि मका या पिकांच्या नियोजन करावे. भात पिकासाची तयारी सुरु ठेवावी, खराप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीचा प्रकारपाहून कामे करावी.

शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणीची कामे करु नये. पावसात खंड पडल्यास पेरणी वाया देखील जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये.शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणारी पीके शेतकऱ्यांनी शक्यतो घ्यावीत. पावसाची परिस्थिची लक्षात घेऊन पीक पध्दतीचा अवलंब करावा. कोकणात भात रोपे दोन टप्प्यात घ्यावीत, पावसाचे प्रमाण पाहून भाताची लागवण करणे यामुळे सोपे होईल.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com