प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत यांची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत (४१) माटुंगा येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबई: प्रसिद्ध चित्रकार रामचंद्र कामत (४१) माटुंगा येथील आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 बुधवारी (ता. १९) दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास रामचंद्र उर्फ रामइंद्रनिल कामत घरी बाथटबमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांना मृत घोषित केले.

सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नसल्याचे लिहिले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

रामचंद्र कामत चित्रकारासोबत छायाचित्रकारदेखील होते. त्यांचे ग्रास पेंटीग विशेष प्रसिद्ध होते. माटुंग्यात आपल्या आईसोबत ते राहत होते. आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा जबाब नोंदवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्या मृतदेहाची कोरोना चाचणीही करण्यात आली असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. त्यानंतर शवविच्छेदन करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या