महाराष्ट्रात एका दिवसात 53 मृत्यू 

Dainik Gomantak
बुधवार, 13 मे 2020

राज्यात कोव्हिड-19 विषाणूच्या 1026 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 24,427 झाली आहे.

मुंबई

राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असून, एका दिवसात सर्वाधिक 53 जणांचा बळी गेला. त्यामुळे मृतांची संख्या 921 झाली आहे. राज्यात कोव्हिड-19 विषाणूच्या 1026 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 24,427 झाली आहे.आणखी 339 रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत एकूण 5125 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबईतील 28, पुण्यातील 6, पनवेलमधील 6, जळगावमधीळ 5, सोलापूर शहरातील 3,ठाण्यातील 2 आणि रायगड, औरंगाबाद शहर व अकोला शहरातील प्रत्येकी एक अशा एकूण 53 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 29पुरुष आणि 24 महिला आहेत. मृतांपैकी 21रुग्ण 60 वर्षे किंवा त्यावरील, 27रुग्ण 40 ते 59 वयोगटातील आणि 5 रुग्ण 40 वर्षांखालील होते. या 53 रुग्णांपैकी 35 जणांना (66  टक्के)मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार होते. कोव्हिड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या 921 वर गेली आहे.

थ्रोट स्वॅब तपासणी : 2,21,645
निगेटिव्ह : 1,95,804
पॉझिटिव्ह : 24,427
क्‍लस्टर कंटेनमेंट झोन : 1289 
सर्वेक्षण पथके : 12,923
लोकसंख्येची पाहणी : 54.92 लाख
एकूण कोरोनामुक्त : 5125
होम क्वारंटाईन : 2,81,655
संस्थात्मक क्वारंटाईन : 15,627

संबंधित बातम्या