नागपूर-उमरेड रोडवर तवेराची ट्रकला धडक, भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील उमरेड रोडवर भीषण अपघात झाला आहे
नागपूर-उमरेड रोडवर तवेराची ट्रकला धडक, भीषण अपघात 7 जणांचा मृत्यू
AccidentDainik Gomantak

महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरातील उमरेड रोडवर भीषण अपघात झाला आहे . या कार अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी तवेरा कार ट्रकला धडकली. मृत्युमुखी पडलेल्या सात जणांपैकी सहा महिला होत्या. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. उमरेड रोडवरून नागपूर शहराच्या दिशेने येत असताना उमरगाव फाट्याजवळ रात्री 10 वाजता हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकला तवेरा वाहन ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एका मुलीचा जीव वाचला आहे. मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव वेगाने येणारी तवेरा कार नागपुरातील उमरेड रस्त्यावरून जात होती. दरम्यान, तवेरा चालकाने समोरून जाणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते करत असताना कारची ट्रकला धडक बसली. (Nagpur Accident)

Accident
लोको पायलटने जीव धोक्यात घालून वाचवले प्रवाशांचे प्राण, व्हिडीओ आला समोर

अपघातात सगळ्यांनाच जीव गमवावा लागला, एकच मुलगी वाचली!

या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. तर एक जण जखमी झाला आहे. या अपघातातून बचावलेल्या मुलीवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलगी गंभीर जखमी झाली आहे. रात्री झालेला अपघात एवढा भीषण होता की, अपघात होताना किंवा त्यानंतर घडलेली परिस्थिती ज्या कोणी पाहिली त्यांचे हृदय हेलावून गेले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार ही चूक तवेरा चालकाकडून झाली होती. या अपघातात तवेरामधील सर्व जण जागीच ठार झाले. फक्त एक मुलगी वाचली.

Accident
दुबईतून पोटात लपवून आणले 10 लाखांचे अंमली पदार्थ, मुंबईत विमानतळावर केली झडती

कारचा चक्काचूर झाला

ट्रकला धडकलेल्या कारचा क्रमांक 4315 आहे. ही कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. अपघात होताच स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस उपायुक्त नुरुल हसन, वाहतूक विभागाचे उपायुक्त सारंग आव्हाड यांच्यासह अनेक पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत. अपघातानंतर वाहतुकीवर परिणाम झाला. लांबपर्यंत गाड्यांची रांग लागली होती. पोलिसांनी रस्त्यावरून वाहने हटवून वाहतूक कोंडी सुरळीत केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.