औरंगाबादेत कोरोनाने  पार केला ९००चा टप्पा

covid 19
covid 19

औरंगाबाद

शहरात कोरोनाच्या रुग्णवाढीचे मीटर वाढतच चालले आहे. शुक्रवारी (ता.१५) दिवसभरात ९३ रुग्णांची वाढ झाली. त्यानंतर शनिवारी (ता.१६) सकाळी ३०, तर दुपारी २८ अशी दिवसभरात ५८ रुग्णांची भर पडली असून, एकूण संख्या ९०० वर पोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
शहरात आठ मे रोजी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आढळले होते. नंतरच्या आठवडाभरात म्हणजेच शुक्रवारी (ता.१५) दिवसभरात ९३ रुग्ण वाढले, तर चौघांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी एमजीएम मेडिकल कॉलेज-३,  हनुमान चौक, चिकलठाणा -१, रामनगर-३, एमआयडीसी-१, जालाननगर-१, संजयनगर, लेन नं. सहा-३, सादातनगर-४, किराडपुरा-१, बजाजनगर-१, जिन्सी परिसर-१, जुना मोंढा, भवानीनगर, गल्ली नं. पाच-१, जहागीरदार कॉलनी-१, आदर्श कॉलनी-१, रोशन गेट-१, अन्य ठिकाणचे ७ असे ३० रुग्ण वाढले. त्यानंतर दुपारी चारनंतर २८ नव्या रुग्णांची भर पडली.
दुपारी कैलासनगर -१, चाऊस कॉलनी-१, मकसूद कॉलनी-२, हुसेन कॉलनी -४, जाधववाडी-१, न्यू बायजीपुरा, गल्ली नं. तीन-१, एन-सहा, संभाजी कॉलनी-१, कटकट गेट -१, बायजीपुरा-१०, अमर सोसायटी, एन-आठ-२, लेबर कॉलनी-१, जटवाडा-१, राहुलनगर-१ आणि जलाल कॉलनी -१ या भागांतील रुग्ण आहेत. ५८ बाधितांमध्ये ३३ पुरुष आणि २५ महिला रुग्णांचा समावेश आहे, असेही जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

कोरोना मीटर 
उपचार घेणारे--५६८
बरे झालेले ---३०७
मृत्यू झालेले --२५
--------------
एकूण--९००
----------------------

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com