कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 मार्च 2021

कोरोनाचा फटका आता 94 व्या मराठी साहित्य संमेलनालादेखील बसला आहे. नाशिकमध्ये 26 मार्च ते 28 मार्च दरम्यान आयोजित कऱण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई : जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांवर विरजण पडलं. कोरोनाचा फटका आता 94 व्या मराठी साहित्य संमेलनालादेखील बसला आहे. नाशिकमध्ये 26 मार्च ते 28 मार्च दरम्यान आयोजित कऱण्यात आलेलं मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी कोरोनाचा वाढता प्रभाव बघता संमेलन नियोजित तारखांना घेतल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती आहे, त्यामुळे भविष्यात होणारे गंभीर परिणाम लक्षात घेता, संमेलन स्थगित केल्याचे सांगितले. 

आख्खं महाराष्ट्र आता चाखेल हापूसची चव; रत्नागिरी विभागाची व्यावसायिक पद्धतीने तयारी

94 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची तयारी जवळपास पूर्ण होत आली होती. निमंत्रणेदेखील पाठवण्यात आली होती. परंतु, एकंदर कोरोनाची परिस्थिती पाहता, साहित्यिकांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे मराठी साहित्य मंडळाने सांगतिले. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यावर हे संमेलन आयोजित करण्याचा पुन्हा विचार केला जाईल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, नाशिकमधील कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, अनेक निर्बंधदेखील घालण्यात आले आहेत. नाशिकमधील गोखले एज्युकेशन सोसायटी मैदानावर 94व्या मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात येणार होतं. 

Big Breaking : अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कारच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू

जयंत नारळीकर यांची यावर्षीच्या मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड झाली होती. जयंत विष्णू नारळीकर हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि आणि स्ट्रोफिजिक्स इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर मधील एमेरिटस प्रोफेसर आहेत. त्यांनी सर फ्रेड होयलसह कन्फर्मल गुरुत्व सिद्धांत विकसित केला, जो होयल-नारळीकर सिद्धांत म्हणून ओळखला जातो. अल्बर्ट आइनस्टाइनच्या सापेक्षतेचा सिद्धांत आणि मॅचच्या तत्त्वावर हे संश्लेषण करते. 

 

संबंधित बातम्या