94 वे मराठी साहित्य संमेलन : अध्यक्षपदी डॉ. जयंत नारळीकर

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली.

नाशिक :  ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ पद्मविभूषणचे सन्मानार्थी अन् विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिकमधील ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी बहुमताने निवड करण्यात आली. संमेलनाच्या इतिहास पहिल्यांदा खगोलशास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान लेखकाला अध्यक्षपद मिळाले. 

मुंबईकरांनो..काळजी घ्या ! शहराचे प्रदूषण धोकादायक पातळीवर

संमेलनाध्यक्षपदासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि घटक व संलग्न संस्थांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत तासभर खल झाला. त्यानंतर संमेलनस्थळी गोखले एज्युकेशन सोसायटीच्या औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील संमेलन कार्यालयात काल सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. तसेच नाशिकमध्ये दीड दशकानंतर होत असलेले साहित्य संमेलन २६ ते २८ मार्चला साजरे होईल, असेही ठाले-पाटील यांनी जाहीर केले. 

राज्यात सुरू होणार 'जेल टूरिझम'

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या