कोकणच्या तिलारीत भूकंपाचे सौम्य धक्के

तिलारी (Tilari) येथे मध्यरात्री 3.7 रिष्टर स्केल भूकंपाच्या (earthquake) धक्क्याची नोंद झाली आहे.
कोकणच्या तिलारीत भूकंपाचे सौम्य धक्के
A magnitude 3.7 earthquake shook Tilari at midnight Dainik Gomantak

तिलारी (Tilari) येथे मध्यरात्री 3.7 रिष्टर स्केल भूकंपाच्या (earthquake) धक्क्याची नोंद झाली आहे. भूकंपाचा धक्का रात्री 2 वाजून 34 मिनिटांनी बसला असे वेधशाळेने म्हटले आहे. भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली असली तरी तिलारी क्षेत्रात भूकंपाचे धक्के जाणवले नाही. भूकंप वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांनी ही माहिती दिली आहे.

A magnitude 3.7 earthquake shook Tilari at midnight
जेष्ठ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे दु: खद निधन

रविवारी म्हणजेच काल मध्यरात्रीच्या सुमारास राज्यातील काही भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. कोकण पट्ट्यामधील देवरुख भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग येथे आंतरराज्य असलेल्या तिलारी धरण क्षेत्रात पण भूकंप झाल्याची नोंद झाली आहे.

भूकंपाची तीव्रता 3.7 रिष्टर स्केल एवढा कमी असल्याने तो तिलारी क्षेत्रात जाणवला नाही. भूकंपाच्या बाबतीत वेधशाळा कोनाळकट्टाचे अधिकारी त्रंबे यांना विचारले असून, भूकंपाचा धक्का बसल्याची नोंद झाली आहे. पण, भूकंपाचे धक्के जाणवले नाहीत, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com