ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार; POCSO अंतर्गत सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देण्यासाठी आलेल्या महिलेबाबत ती अल्पवयीन असतानाच विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे.
minor woman giving birth at Sassoon Hospital in Pune
minor woman giving birth at Sassoon Hospital in PuneDainik Gomantak

पुणे: महाराष्ट्रातील पुणे शहरात एका महिलेच्या सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म देण्यासाठी आलेल्या महिलेबाबत ती अल्पवयीन असतानाच विवाहबद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णालयात दाखल महिलेची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांना हा प्रकार कळताच त्यांनी पुणे शहर पोलिसात तक्रार दाखल केली.

(A minor woman giving birth at Sassoon Hospital in Pune)

minor woman giving birth at Sassoon Hospital in Pune
नितेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पत्राद्वारे खरमरीत टीका

यानंतर पोलिसांनी महिलेचे आई-वडील, पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात, पोलिसांनी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे.

त्याचवेळी या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असलेले लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वैभव मोरे यांनी सांगितले की, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

minor woman giving birth at Sassoon Hospital in Pune
पुण्यात स्मृती इराणींविरोधात निदर्शन, अन् NCPच्या महिला पदाधिकाऱ्याला कथित मारहाण

या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुलाला जन्म देणारी महिला 18 वर्षांची झाल्याची माहिती आहे. तिचे लग्न झाले तेव्हा ती अल्पवयीन होती. गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतही असाच प्रकार समोर आला होता.

सरकारी रुग्णालयातून माहिती मिळाल्यानंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला. गेल्या तीन महिन्यांपासून गर्भवती असलेल्या अल्पवयीन विवाहित मुलीवर ते उपचार करत असल्याची माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून मुलीच्या पती आणि वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींवर बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि पॉक्सो कायद्याच्या कलमांखालीही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com