ग्रामपंचायत निवडणुकीतून 'आप'ची महाराष्ट्र्रात एन्ट्री   

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 18 जानेवारी 2021

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. व या निकालांमध्ये काही पक्षांनी आपले गड राखले आहेत.

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. व या निकालांमध्ये काही पक्षांनी आपले गड राखले आहेत. आणि याउलट काही पक्षांना आपली सत्ता गमवावी लागल्याचे दिसते. त्यानंतर यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेने चांगल्या जागा जिंकत स्थानिक पातळीवर देखील वर्चस्व निर्माण केल्याचे चित्र आहे. तर दिल्लीच्या विधानसभेवर सलग बाजी मारलेल्या आम आदमी पक्षाने महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतून राज्यात प्रवेश केला आहे. लातूर जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीत आप पक्षाने विजय मिळवलेला आहे.  

आपच्या पक्षाने लातूर जिल्ह्यातील दापक्याळ येथील ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. आप पक्षाचे युवा अध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी याबाबतची माहिती सोशल मीडियावरील ट्विटरच्या माध्यमातून दिलेली आहे. दापक्याळ मधील ग्रामपंचायत निवडणुकीत आप पक्षाच्या सात पैकी पाच उमेदवारांनी विजय मिळवला आहे. आपचे जिल्हा अध्यक्ष प्रताप भोसले यांच्या नेतृत्वाखाली आपने हे यश मिळवलेले आहे. या विजयानंतर अजिंक्य शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून, विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. 

अजिंक्य शिंदे यांच्या ट्विटवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील रिट्विट केले असून, या रिट्विट मध्ये त्यांनी मराठी मध्ये विजेत्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच अरविंद केजरीवाल यांनी पुढे या ट्विट मध्ये जनतेने दाखवलेल्या विश्वासाला सार्थ करा आणि जनतेची सेवा करा, असे लिहीत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.       

संबंधित बातम्या