इंजेक्शन देवून 16 वर्षांच्या मुलीवर 8 वर्ष केला अत्याचार

इंजेक्शन देवून 16 वर्षांच्या मुलीवर 8 वर्ष केला अत्याचार
rape case

मुंबई: मुंबईच्या(Mumbai) अंधेरी भागात 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आठ वर्षांपासून बलात्कार(Rape case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे अपहरण केल्यानंतर तिला अ‍ॅफ्रोडिसियाक्स इंजेक्शन(aphrodisiacs injection) देण्यात आले आणि त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. ही अल्पवयीन मुलगी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी आहे आणि तिचे वडील एक व्यवसायिक आहेत. ( abused a 16 year old girl for 8 years) 

अल्पवयीन मुलीच्या शेजारचा रहिवाशी असलेल्या एका व्यक्तीवर अल्पवयीन मुलीला औषध आणि अ‍ॅफ्रोडिसियाक्सची इंजेक्शन्स घेण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तो अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत होता. त्या मुलीने पुढे असा दावा केला की या पुरुषाच्या पत्नीलाही याची माहिती होती. मात्र अटक केलेल्या जोडप्याने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

27 पानांची एक नोट सापडली

या प्रकरणात आणखी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुलीच्या नातेवाईकांचा ही समावेश आहे. त्यापैकी अल्पवयीन मुलीचा काका आणि त्याचा 19 वर्षांचा मुलगा सुद्धा आहे. पीडितेने तक्रारीत म्हटले आहे की तिचे वडील तिला लग्नासाठी उत्तर प्रदेशात घेऊन गेले होते, तेथे काकाच्या मुलाशी तिचा संबंध जोडल्या गेला होता. मिळालेल्या माहितीनुसार आंबोली पोलिस स्टेशनला 27 पानांची एक नोट सापडली आहे. जे पीडित मुलीने तिच्या पालकांना लिहिली आहे.

मला गोळ्याचे व्यसन लागले
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, मिळालेल्या नोट मध्ये पीडितेने लिहिले आहे की, तिला गोळ्याचे व्यसन होते. पीडितेची व्हिडिओ क्लिप असल्याचे सांगून शेजाऱ्याने तीला धमकावल्याचे सांगितले आहे आणि त्या अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ती नैराश्यात गेली. आणि तीला गोळ्यांचे व्यसन लागले.

पोलिसांनी केला बचाव
पीडित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि त्यांची टीम वरिष्ठ निरीक्षक सोमेश्वर कामठे, निरीक्षक अब्दुल रऊफ शेख यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात जाऊन पीडितेची सुटका केली. रविवारी पोलिसांनी पीडित मुलीचा काका आणि त्याच्या मुलाला अटक केली.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com