राज ठाकरेंवर आजच कारवाई होणार - पोलीस महासंचालक

15 हजार लोकांवर करण्यात आली प्रतिबंधात्मक कारवाई
Director General of Police
Director General of PoliceDainik Gomantak

मुंबई : राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे घेतलेल्या सभेत पुन्हा भोंगा आणि हनुमान चालीसा मुद्यावरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला सुनावलं असून राज्यसरकारने याबाबत ताडीने निर्णय घ्यावा अन्यथा समाजात तेढ निर्माण होईल. असे ही राज ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. ( Action will be taken against Raj Thackeray today - Director General of Police )

Director General of Police
राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी 15 हजार लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून १३ हजार लोकांना नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.

Director General of Police
राज ठाकरेंना होणार अटक? काय आहे प्रकरण

राज्यातील सद्यस्थिती पाहता “गृहमंत्र्यांनी कायदा आणि सुव्यस्थेच्या दृष्टीने आढावा बैठक घेतली. महाराष्ट्र पोलीस दल कायदा सुव्यस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहेत. आमची पूर्ण तयारी आहे. कोणत्याही परिस्थितीत कायदा बिघडू नये यासाठी आम्ही सर्वांना सूचना केल्या आहेत. याआधी समाजकंठक, गुन्हेगार स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे,” अशी माहिती रजनीश सेठ यांनी दिली.

“सामाजिक एकोपा राखण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेतल्या आहेत. एसआरपीएफ, होमगार्ड मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत.यासाठी एसआरपीएफच्या 87 तुकड्या आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. कोणत्याही प्रकारे कायदा सुवयवस्था राखावी यासाठी त्यांना सूचना करण्यात आल्या आहेत,” असं रजनीश सेठ यांनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com