अभिनेता सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट 

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

सोनूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.यावेळी त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या स्वरुपाची चर्चा झाली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

मुंबई : बेकायदेशीररित्या बांधकाम केलं आसल्याचा आरोप मुबंई महानगरपालिकेनं केला असताना अभिनेता सोनू सूद पुन्हा एखदा चर्चेत आला आहे.सोनूने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे.यावेळी त्यांच्यामध्ये नेमकी कोणत्या स्वरुपाची चर्चा झाली हे मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.

पण सोनू सूद आणि पवार यांच्यात महानगरपालिकेकडून होत असणाऱ्या आरोपाविषयी चर्चा झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.बेकायदा बांधकमाविषयी वारंवार नोटीस असून आपण कोणत्याही स्वरुपाचं बेकायदा बांधकाम केलं नसल्याचं म्हटलं आहे.तसचं पाटवून ही सोनूने कायद्याचे उल्लंघन करणं थांबवलं नाही.तसचं सोनूला कारवाईपासून कोणत्याही स्वरुपाचा दिलासा न्यायालयाने देवू नये अशी मागणी पालिकेनं केली आहे.

सोनूने मुबंई महानगरपालिकेनं केलेल्या कारवाईच्या विरोधात उच्चन्यायालयात धाव घेतली पालिकेनं कारवाईची पाठवलेली नोटीस रद्द करण्याची मागणी ही सोनूने न्यायालयात केली.मात्र त्याने केलेल्या दाव्यात कोणत्याही प्रकारची सत्यता नसल्याचं प्रतिज्ञापत्राद्वारे पालिकेनं न्यायालयात सांगितलं.

निवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रुपांतर करुन  सोनू त्यातून नफा कमवायचा त्यामुळे त्याच्यावर दोनवेळा पालिकेने कारवाई करुन ही त्याने विनापरवाना हॉटेल सुरुचं ठेवलं. मात्र आपण कोणत्याही स्वरुपाचं बेकायदा बांधकाम केलं नसून महाराष्ट्र नगर परिषद नियोजन कायद्यानुसारचं बांधकाम केलं आसल्याचा दावा सोनूने केला आहे.तर दुसरीकडे पालिकेनं सोनूला निवासी इमारतीचं व्यवसायिक कारणांसाठी परवानगी दिली नव्हती,जूहूमध्ये स्थित शिवसागर या निवासी सहा मजली इमारतीचं हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आली ती सोनू आणि त्याच्या पत्नी सोनालीच्या मालकीची आसल्याची कोणतीही कागदपत्रे अस्तित्त्वात नाहीत असं पालिकेनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या