अश्लिल चित्रफित प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

चंदेरी दुनियेत आपलं नशिब आजमावण्यासाठी नेक तरूण-तरूणी मुंबईची कास धरतात. काही यशस्वी होतात, तर काहींना मन मारून उदरनिर्वाहासाठी इतर मार्ग निवडावे लागतात.

मुंबई : चंदेरी दुनियेत आपलं नशिब आजमावण्यासाठी नेक तरूण-तरूणी मुंबईची कास धरतात. काही यशस्वी होतात, तर काहींना मन मारून उदरनिर्वाहासाठी इतर मार्ग निवडावे लागतात. काम मिळवू बघणाऱ्या या कलाकारांचा अनेकांकडून गैरफायदादेखील घेतला जातो. मुंबईतील असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील एका पॉर्न फिल्म प्रोडक्शन कंपनीद्वारे कामाची गरज असलेल्या कलाकार तरूणींना काम देता असे सांगत भूलवून, त्यांच्या अश्लिल चित्रफित बनवून मोबाईल ऍपवर टाकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक करण्यात आली आहे. गहना वशिष्ठ ही माजी मिस आशिया राहिली आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज सिंधुदुर्ग दौरा

मुंबईतील मढ बीचनजीक असलेल्या ग्रीन पार्क बंगल्यात बंगल्यात सदर प्रकार सुरू होता. या कामासाठी सदर गुन्हेगारांनी हा बंगला भाड्याने घेतला होता. पोलिसांना या बंगल्यावर धाड टाकत आरोपींना अटक केली आहे, तर एका पिडित तरूणीची यातून सुटका करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींचे बॉलिवूड कनेक्शनदेखील उघडकीस आले आहे. हे गुन्हेगार अश्लिल चित्रफिती बनवून पॉर्न साईट आणि मोबाइल ऍपवर टाकण्याचा व्यवसाय करत होते. यांच्या चॅनेलची सदस्यता घेतलेल्या लोकांना अश्लिल चित्रफित बघण्यासाठी 2 हजार रुपये द्यावे लागत होते. या साईटवर आजपर्यंत 87 अश्लिल चित्रफिती अपलोड करण्यात आल्या आहेत. 

अटक केलेल्यांमध्ये अभिनेत्री गहना वशिष्ठसह एक महिला, दोन आभिनेत्यांना अटक करण्यात आली आहे. कामाची गरज असलेल्या कलाकार तरूणींना काम देता असे सांगत भूलवून, त्यांच्या अश्लिल चित्रफित बनवून मोबाईल ऍपवर टाकण्याचा प्रकार यांच्यामार्फत सुरू होता. पोलिसांनी धाड टाकल्यावर एका अश्लिल चित्रफितीचे शुटिंग सुरू असल्याचे त्याच्या निदर्शनास आहे. हे तात्काळ थांबवत पोलिस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनात एक महिला ग्राफिक डिझायनर, दोन अभिनेते, कॅमेरामन आणि फोटोग्राफर यांना अटक करण्यात आली आहे.

 

संबंधित बातम्या