नवरात्रीचे अवचित्य साधून महिलांसाठी कोरोना लसीकरण; आदिती तटकरे

महिलांचे women जीवन अधिक सुरक्षित करणे व त्यांचे लसीकरणाचे vaccination प्रमाण वाढावे या उद्देशाने ही मोहीम राबविली जाणार आहे.
नवरात्रीचे अवचित्य साधून महिलांसाठी कोरोना लसीकरण; आदिती तटकरे
Covid Vaccination Dainik Gomantak

रायगड: जिल्ह्यातील 18 वर्षावरील सर्व महिलांसाठी नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते नियोजन करावे असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

Covid  Vaccination
रायगड-रत्नागिरीला जोडणारा आंबेत-म्हाप्रळ पूल दोन वर्षानंतर सुरू

कोरोनाची (Covid 19) तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केल्याने आणि नवरात्रीचे Navratri अवचित्य साधून रायगड जिल्ह्यातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी फक्त महिलांसाठी कोरोना लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी कोरोना लसीकरण केंद्रावर सोमवार, दि. 11 ऑक्टोबर 2021 रोजी केवळ महिलांचे लसीकरण होणार आहे. महिलांचे जीवन अधिक सुरक्षित करणे व त्यांचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने हि मोहीम राबविली जाणार आहे. जिल्ह्यातील महिलांनी या मोहिमेचा अधिकाधिक महिला उपयोग करून घेतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. आपली व आपल्या कुटूंबाचे आरोग्य सुरक्षित राखण्यास लशीकरणांनंतर मदत होईल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com