आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 20 मार्च 2021

राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 मुंबई: (Aditya Thackeray Corona Positive) राज्यात कोरोना संसर्ग अतिशय वेगाने वाढत आहे. राज्यातील सामान्य नागरिकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वचजण कोरोनाच्या विळख्यात अडकत चालले आहेत. यातच महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे.

आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ''माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी योग्य ती काळजी घ्यावी. आणि लवकरात लवकर कोरोना चाचणी करुन घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की, सर्वांनी कायम मास्क घाला. आणि आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.'' असं आवाहन त्यांनी केलं आहे. (Aditya Thackeray Corona Positive)

कोरोना: महाराष्ट्राची परिस्थिती चिंताजनक! इतर 10 राज्यांतही संसर्गात वाढ

राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे 15 मार्च ते 17 मार्च सलग तीन दिवस ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका खासगी रिसॉर्टमध्ये वास्तव्यास होते. आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टिकेनंतर आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची माहिती सर्वांना झाली होती.

 

संबंधित बातम्या