आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे कोसळणाऱ्या कष्टकरी शिवसैनिकांना न्याय द्या...

शिवसेनेतील तरूण नेते, आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव जोरदार चर्चेत आहे.
आदित्य ठाकरे, श्रीकांत शिंदे कोसळणाऱ्या कष्टकरी शिवसैनिकांना न्याय द्या...
Aditya Thackeray Shrikant ShindeTwitter

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगाने बदलत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या मुख्यमंत्र्यांचा सरकारी बंगला सोडून मातोश्रीवर गेले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची ताकद सातत्याने वाढत आहे.आणि आता तेही मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Political Crisis)

दरम्यान, महाराष्ट्रातील आणखी 4 आमदार शिंदे गटात सामील झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांना फक्त 16 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगण्यात येत आहे. 54 सदस्यांची शिवसेना आता कोसळण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. इकडे आज दिवसभर राज्यातील राजकीय हालचाली तीव्र होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत सातत्याने बैठका होणार आहेत. दुसरीकडे, नव्या सरकार स्थापनेसाठी भाजपने पहिला डाव टाकत राज्यपालांना पत्र पाठवलं आहे. या पत्रामध्ये त्यांनी सध्याच्या सरकारमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Aditya Thackeray Shrikant Shinde
'24 तासात परत या, महाविकास आघाडी सोडण्याचा विचार करु' : संजय राऊताचं मोठं वक्तव्य

तसेच शिवसेनेतील तरूण नेते, आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांचे नाव जोरदार चर्चेत आहे. कारण या दोन्ही तरूण नेत्यांच्या भविष्याचा विचार करता राज्यातील राजकारण गोल गोल गिरक्या घालत असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच शिवसेनेवर आलेले हे संकट दूर करण्यासाठी शिवसेना खासदार आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे यांना दिपाली सय्यद यांनी साद घातली आहे.

"शिवसैनिक कष्ट करतो आणि घरदार सांभाळून शिवसेना पक्ष वाढवतो. त्याला ना सत्तेचा लोभ, ना पैशाचा तो फक्त शिवसेनेचा पाईक आहे. माननीय आदित्य साहेब ठाकरे व श्रिकांत शिंदे साहेब यांनी हि जबाबदारी घेऊन कोसळणाऱ्या शिवसैनिकांना न्याय द्यावा. जय महाराष्ट्र!," असे ट्विट दिपाली सय्यद यांनी केले आहे.

यापूर्वीही दिपाली सय्यद यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले होते. हिंदुत्वासाठी देवेंद्र फडणवीस यांची उपमुख्यमंत्री पदावर बसण्याची तयारी आहे का? भाजपाचे हिंदुत्व सत्तेसाठी कि महाराष्ट्र हितासाठी? भाजपाने या प्रश्नाचे उत्तर दिल्यास सर्व सत्य असत्य बाहेर येईल, असे सवाल सय्यद यांनी भाजपला ट्विट करून विचारले होते.

Aditya Thackeray Shrikant Shinde
एकनाथ शिंदे रेडिसन हॉटेलच्या बाहेर, विमानतळाच्या दिशेनं एकटे रवाना

याबरोबरच, "सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मला शिवसेनेत घेऊन आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरेसाहेबांनी मला शिवसेनेत वावरायला शिकवले. दोन्ही बाजु गुरूचरणी, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती? आमची निष्ठा प्रतिष्ठा शिवसेनेच्या चरणी भविष्यात जे होईल त्याचा स्विकार करू," असे ट्विट करत विठ्ठलाला दीपाली सय्यद यांनी एकप्रकारे सादच घातली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com