मोदींशी जुळवून घ्या आणि भाजपशी पुन्हा युती करा : सरनाईकांचा लेटर बाॅम्ब

मोदींशी जुळवून घ्या आणि भाजपशी पुन्हा युती करा : सरनाईकांचा लेटर बाॅम्ब
Adjust with PM Modi, says ShivSena leader Pratap Sarnaik

मुंबई  : शिवसेना (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांना पत्र (letter) लिहून पुन्हा युती केली तर पालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाला फायदा होईल असे सांगितले आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेसोबत असणारे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचेच आमदार फोडत आहेत. त्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे. त्यापेक्षा जर मोदींशी जुळवून घेऊन पुन्हा भाजपशी युती केली तर शिवसेनेला याचा फयदाच होईल. युती तुटली तरी भाजपच्या नेत्यांशी आपले वैयक्तिक संबंध चांगले आहेत. दोन्ही पक्षात अजूनही जिव्हाळा आहे, तो तूटण्याआधी परत जुळवून घेतले तर चांगले होईल. (Adjust with PM Modi, says ShivSena leader Pratap Sarnaik)

काॅंग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना फोडतायेत

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेले काम वाखाडण्या जोगेच आहे. तसेच त्यांनी दिल्लीत जाऊन प्रधानमंत्र्यांची देखील भेट घेतली. राजकारणाला बाजूला ठेऊन आपण मुख्यमंत्री पदाला प्रामाणिकपणे न्याय देत आहात. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील लोकांना आपल्यामुळेच शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटत आहे. काँग्रेसने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. तर राष्ट्रवादी शिवसेनेचेच नेते फोडत आहे. गेल्या दीड वर्षात मी अनेक आमदारांशी चर्चा केली त्यात काँग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात. पण आपला मुख्यमंत्री असून शिवसेना आमदाराची कामे होत नाहीत. त्यामुळे अमदारांमध्ये नाराजी आहे. एका विशिष्ट परिस्थितीत महाविकास आघाडी तयार झाली पण शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करण्यासाठी महाविकास आघाडी स्थापन केलेली नाही. असे प्रताप सरनाईकांनी या लेटर बॉम्बमध्ये म्हणले आहे.  

दरम्यान, काॅंग्रेसने स्वबळचा नारा दिल्यास राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रीतपणे निवडणुका लढवतील असे विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेत कधीच वितुष्ट येणार नाही. असेही त्यांनी नमूद केले. 

तर काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या लेटर बाॅम्बला उत्तर देताना म्हणाले, हा शिवसेनेचा आंतर्गत प्रश्न आहे.  

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com