40 वर्षानंतर सलग मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिलो: फडणवीस

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हल्लाबोल केला आहे.
40 वर्षानंतर सलग मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिलो: फडणवीस
Devendra FadnavisDainik Gomantak

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसन माध्यमांशी संवाद साधताना (Devendra Fadnavis) यांनी पवारांवर हल्लाबोल केला आहे.

फडणवीस म्हणाले, शरद पवारांची प्रेस कोणत्या कारणासाठी होती हे मला लक्षातच आले नाही. पवारसाहेब पत्रकार परिषदेमध्ये वेगवेगळ्या विषयावर बोलले. उत्तर प्रदेशात घडलेल्या घटनेचा प्रतिकार म्हणून महाराष्ट्रात या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते धुडघुस घालतात हे कोणतं राज्य आहे? महाराष्ट्र बंदच्या नावावर शिवसेनेचे नेते, पदाधिकारी सामान्य नागरिकांना धमकावतात. तसेच मावळमध्ये जो पोलिसांनी गोळीबार केला तो राज्य सरकारच्या आदेशावरुनच केला गेला होता. तसेच उत्तर प्रदेेशमधील लखीमपूर हिंसाचारासंबंधीचा आरोप हा केंद्रीय राज्य गृहमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलावर आहे. त्याचबरोबर शरद पवारसाहेबांचा न्यायालयावर विश्वास आहे का? नाही हा माझा सवाल आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशांवरुन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली आहे. चीन असो किंवा पाकिस्तान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटवर येत त्यांना जशाच तसे उत्तर दिले आहे. 40 वर्षानंतर सलग मी पाच वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिलो आहे.

Devendra Fadnavis
मोदी सरकारकडून यंत्रणांचा गैरवापर: शरद पवार

तसेच, माध्यमांशी बोलताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सलग पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहीलो. तब्बल चाळीसवर्षानंतर मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिलो. राज्यातेल पवारसाहेब मोठे नेते आहेत. मात्र ते कधीच राज्याचे सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहीले नाहीत. ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहिले असते तर बर झालं असतं. त्यांनी राज्याच्या भल्याचेच निर्णय घेतले असते. परंतु त्यावेळच्या परिस्थितीमुळे त्यांना कधी अडीच वर्षे तर कधी दीड वर्षे असं त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदावर राहावं लागलं. पण एक गोष्टीचं मला अत्यंत समाधान आहे की, मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून समाधानी आहे. हे पाहून अख्ख ठाकरे सरकार अस्वस्थ आहे. हीच माझ्या कामाची पावती आहे.

Related Stories

No stories found.