कोरोनानंतर वाढला सरकारी शाळांचा पट

2021 मध्ये महाराष्ट्रात ज्या विध्यार्थांची (Students) शाळेत नोंदणी झाली आहे. अशा 70.4 मुलांना घरातून अभ्यासासाठी (study) मदत मिळत आहे.
कोरोनानंतर वाढला सरकारी शाळांचा पट
StudentsDanik Gomantak

कोल्हापूर: कोरोना महामारीच्या (Covid 19 ) संकटानंतर राज्यातील सर्व शाळा सुरु झाल्या आहेत. यामध्ये सरकारी शाळांचा पट 9 टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात 2018 मध्ये 60.5 टक्के मुलांची सरकारी शाळेत नोंदणी होती. आता ते प्रमाण वाढले असून 2021 मध्ये 69.7 टक्के झाले आहे. परंतु अजूनही मुलींच्या तुलनेत मुलांची खासगी शाळेत जाण्याचे नोंदणी प्रमाण जास्त आहे.

तसेच खासगी शिकवणीत विद्यार्थ्यांची (students) संख्या ही सहा टक्क्यांनी वाढून ती 20.7 टक्के इतकी झाली आहे. लॉकडाउननंतर (lockdown) विद्यार्थ्यांकडे दुप्पट स्मार्ट फोन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे त्यांचे जास्त नुकताच झाले आहे असे स्पष्ट झाले आहे.

Students
अर्बन नक्षलवाद्यांचा शहरांमध्ये सुसळसुळाट;शरद पवार

ऐन्युअल स्टेटसऑफ एज्युकेशन रिपोर्ट (Rural) 2021 हा आज ऑनलाइन प्रकाशित करण्यात आला आहे. असर 2021 सर्वेक्षण हे 25 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेशात केले आहे. हे सर्वेक्षण 76 हजार 706 घरांतील 5-16 वायोगटातील एकूण 75 हजार 234 तसेच, असरने 7 हजार 299 प्राथमिक इयत्ता असलेल्या सरकारी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापकांचे सर्वेक्षण केले आहे अशी माहिती असर समन्वयक भालचंद्र सहारे यांनी दिली आहे.

राष्ट्रीयस्तरावरील (National Level) आकडेवारीची पूर्ण करण्यासाठी असरने 2020 मध्ये एक नवीन सर्वेक्षण विकसित केले आहे. यातून प्राथमिक शाळांतील वेगवगेळे वास्तव अमोर आले आहे. 2021 मध्ये महाराष्ट्रात ज्या विध्यार्थांची शाळेत नोंदणी झाली आहे. अशा 70.4 मुलांना घरातून अभ्यासासाठी मदत मिळत आहे. जे प्रमाण राष्ट्रीयस्तरापेक्षा 66.6 % जास्त आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com