Monsoon Update: 'गुलाब'नंतर आरबी समुद्रातून आता 'शाहीन' चक्रीवादळ धडकणार

अरबी समद्रात (Arabian Sea) तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरुवारी उत्तर कोकण (North Konkan) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर (Palghar) जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Monsoon Update: 'गुलाब'नंतर आरबी समुद्रातून आता 'शाहीन' चक्रीवादळ धडकणार
'गुलाब' चक्रीवादळानंतर आता 'शाहीन' चक्रीवादळ (Shahin Cyclone) देखील येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. Twitter/ DeshGujarat @DeshGujarat

बंगालच्या उपसागरात तयार झालेले 'गुलाब' चक्रीवादळ (Gulab Cyclone) महाराष्ट्रातून गुजरातमध्ये पोहोचले असून, गुरुवारी ते पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच शुक्रवारी आणखीन एका 'शाहीन' (Shahin Cyclone) नावाच्या चक्रीवादळाची निर्मिती अरबी समुद्रात (Arabian Sea) होण्याचा अंदाज आहे. हे चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असून, यामुळे गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत (Near the coast of Maharashtra) अरबी समुद्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे येथे वाऱ्यासह उंच लाटा देखील उसळण्याची शक्यता आहे. 'गुलाब' चक्रीवादळानंतर आता 'शाहीन' चक्रीवादळ देखील येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. अरबी समुद्रात हे वादळ तयार होणार आहे. याला 'शाहीन' असं नाव हे नाव ओमान देशाने दिले आहे. अशा स्थितीत पुढील दोन-तीन दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

 'गुलाब' चक्रीवादळानंतर आता 'शाहीन' चक्रीवादळ (Shahin Cyclone) देखील येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
Goa Monsoon Updates: ‘गुलाब’ गेले आता ‘शाहीन’ची चाहूल

गुलाब चक्रीवादळ आंध्रप्रदेशला धडकल्यानंतर ते तेलंगणा, महाराष्ट्रातील मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातून गुजरातच्या दिशेने गेले आहे. बुधवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र हे दक्षिण गुजरातच्या भागात सक्रिय होत आहे. गुरुवारी ते अरबी समुद्रात गेल्यानंतर पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात 55 ते 65 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पुढे हे भारतीय किनाऱ्यापासून दूर पाकिस्तान आणि मकरानच्या दिशेने जाईल.

 'गुलाब' चक्रीवादळानंतर आता 'शाहीन' चक्रीवादळ (Shahin Cyclone) देखील येत्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि गुजरातला धडकण्याचा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे.
Monsoon Update: 'गुलाब' चक्रीवादळाचा महाराष्ट्र्रालाही फटका,मुंबईसह राज्यात 2 दिवस मुसळधार

अरबी समद्रात तीव्र होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे गुरुवारी उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे. पालघर जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आणि पूर्वविदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणातील पालघरसह काही भाग तसेच नंदूरबार, धुळे, नाशिक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली येथे हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com