अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील महाराष्ट्राचे नवे गृहमंत्री

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रालयाचा कार्यभार दिला आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान मुंबई उच्चन्यायालयाने याप्रकरणी सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आणि 15 दिवसांमध्ये या प्रकरणासंबंधीचा प्राथमिक अहवाल सादर करण्यास सांगितला आहे.

अनिल देशमुख यांच्यानंतर राज्याच्या गृहमंत्री पदावर कुणाची वर्णी लागणार याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागली होती. अखेर याबाबत निर्णय झाला असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे राज्याच्या गृहमंत्रालयाचा कार्यभार दिला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कळवलं आहे. (After the resignation of Anil Deshmukh Dilip Walse Patil is the new Home Minister of the state)

अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर उद्धव ठाकरे शांत का? विरोधी पक्ष पुन्हा आक्रमक  

तर, दिलीप वळसे पाटील यांच्याकडे असलेला कामगार विभागाचा कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे देण्य़ात आला आहे. तर दुसरीकडे मुंबई उच्चन्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असून या प्रकरणी त्यांच्याविरोधातील सीबीआय चौकशीचा आदेश रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालात धाव घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे समोर येत आहे. 

 

 

संबंधित बातम्या