रायगड-रत्नागिरीला जोडणारा आंबेत-म्हाप्रळ पूल दोन वर्षानंतर सुरू

रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला (Rantagiri District) जोडणारा आंबेत-म्हाप्रळ (Aambe-Mhapral) पूल आज सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे.
रायगड-रत्नागिरीला जोडणारा आंबेत-म्हाप्रळ पूल  दोन वर्षानंतर सुरू
Aambe Mhapral bridge is opened Dainik Gomantak

मंडणगड : रत्नागिरी जिल्ह्याला (Rantagiri District) जोडणारा आंबेत-म्हाप्रळ (Aambe-Mhapral) पूल बंद होता. अनेक वर्षानंतर कमकुवत झाल्याने दुरुस्ती कामासाठी हा पूल दोन वर्षासापून बंद ठेवण्यात आला होता. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला (Rantagiri District) जोडणारा आंबेत-म्हाप्रळ (Aambe-Mhapral) पूल शेवटी आज (27) जून रोजी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे. (After Tow years Aambe Mhapral bridge is opened to traffic)

Aambe Mhapral bridge is opened
मुंबई-गोवा महामार्ग-लोहमार्ग बंद पडतो तेव्हा...

आज सकाळी राज्यमंत्री आदिती तटकरे (Aaditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत आंबेत-म्हाप्रळ पुलाचे दुरुस्तीनंतर लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पुलावरून वाहतूक सोडण्यात आली. हा पूल चालू झाल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त केले असून मंडणगड, दापोली तालुक्यातील नागरिक, प्रवाशांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे समाधान नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

Aambe Mhapral bridge is opened
"केंद्रीय पथकं दबावाखाली कारवाई करत आहेत" संजय राऊतांचा घणाघात

दरम्यान काल काल मुंबई-गोवा हायवे सात तासासाठी बंद ठेवण्यात आला होता कारण तेथेही वाशिष्टी नदीच्या पूलाचे बांधकाम सुरू होते. या बांधकामासाठी तब्बल सात तास या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे काल त्या भागात रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी 2 ते 3 किमीपर्यंतच्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com