आईशप्पथ...दीडशे किलोचा मासा सापडला जाळ्यात

 Aishappath  A fish weighing 150 kg was found in the net
Aishappath A fish weighing 150 kg was found in the net

रत्नागिरी: काळबादेवी (Ratnagiri Kalbadevi) मधील मच्छीमाराला तब्बल 150 किलोचा वाघळी मासा (Fisherman Found 150 kg Vaghali Fish) सापडला आहे. विक्रीसाठी नेण्यात येणाऱ्या छोट्या टेम्पोचा पूर्ण हौदा या माशाने व्यापला होता. आत्तापर्यंत सापडलेला सर्वात मोठा मासा आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे (Covid 19) या माशाला दर कमी मिळाला. हा मासा सुमारे सहा फूट रुंद आणि सात फूटापेक्षा अधिक लांब होता. मागील काही दिवसांमध्ये आलेलं तोक्ते चक्रीवादळ (Taukte Cyclone) सरुन गेलं आणि सागरातील मासळी पुरती गायब झाली आहे. छोटे मच्छिमार किनाऱ्यावरुन मिळेल ते मासे घरी घेऊन येत आहेत. मात्र काळबादेवी मधील मासेमारी करणारे संदेश मयेकर यांचे नशीब आज अगदी जोरावर होते. सकाळी अगदी काही अंतरावर मयेकर यांची नौका मासेमारी करत होती. मात्र त्यांना मासे काही मिळत नव्हते. अखेर ते माघारी फिरले. परत येताना मयेकर यांनी सहज जाळे टाकले आणि जाळ्यात मासा लागल्याचे त्यांना जाणवले, जाळे जड लागल्यामुळे त्यांचं अधिकच कुतुहल वाढलं. जाळे पाण्याबाहेर काढण्यास सुरुवात केली असता नौकेमध्ये बसलेले मच्छीमारांच्या चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या. ( Aishappath  A fish weighing 150 kg was found in the net)

मासळी कमी असताना मयेकर यांना वाघाळी माशाची लॉटरी लागली होती. त्यांनी माशाला भराभर पाण्याबाहेर काढला आणि किनाऱ्याकडे घेऊन गेले. हाती लागलेला मासा पाहून नौकेमध्ये बसलेले सगळे मच्छीमार हर्षोउल्हासीत झाले. त्यांनी लगेच मासे विक्रीला घेऊन जाण्यासाठी टेम्पो मागवला. आकाराने मोठी असलेली वाघाळी गाडीच्या हौदातून नेली असता तिने छोट्या टेम्पोमधील पूर्ण जागा व्यापून टाकली होती. 

मिऱ्यामधील काही लोकांनी तो मासा विकत घेतला. सध्या कोरोनाच्या संकटामुळे त्याला अगदीच माफक किंमत मिळाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. पहिल्यांदाच एवढा मोठा मासा रत्नागिरीच्या किनाऱ्यावर सापडल्याचे मच्छीमारांनी सांगितले आहे. या माशाला बाजारामध्ये चांगलीच मागणी असून किलोमागे 170 रुपये दर मिळतो. मागील आठवड्यामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे समुद्र खवळला होता. त्यामुळे हा मासा किनाऱ्यावर आला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एवढा मोठा वाघाळी मासा पहिल्यांदाच मिळाला आहे. सकाळपासून मासेमारी करत होतो, मात्र दुपारी माघारी येताना मासा सापडला. कोरोनाच्या संकटामुळे माशाला दर कमी आहे, असं मयेकर यांनी सांगितलं आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com