उगाच बारामती, बारामती करू नका ; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच आमदाराला सुनावले

आमदार दिलीप मोहिते पाटीलांनी चाकण परिसरात विमानतळ व्हावे, अशी इच्छा दर्शवली होती.
उगाच बारामती, बारामती करू नका ; अजित पवारांनी राष्ट्रवादीच्याच आमदाराला सुनावले
Ajit Pawar Dainik Gomantak

पुणे: चाकण येथील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्याच आमदाराला खडे बोल सुनावले. आमदार दिलीप मोहिते पाटीलांनी चाकण परिसरात विमानतळ व्हावे, अशी इच्छा दर्शवली होती. त्यांच्या मते, विमानतळ झाले असते तर चाकण एमआयडीसी मध्ये आलिशान हॉटेल्स असते, पण, ते विमानतळ आता बारामतीला गेले." (Ajit Pawar taunts NCP MLA in Khed Pune)

Ajit Pawar
पुणे रेल्वे स्थानकात सापडलेली संशयास्पद वस्तू स्फोटक नाही; पोलिसांची माहिती

यावरूनच अजित पवार यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना खडे बोल सुनावले. ते म्हणाले, "विमानतळ हे काय खेळण्यातील नाही की अजून एक द्या असे म्हणायला, त्याचा सर्व्हे करायला लागतो, उगाच बारामती, बारामती करू नका. विमानतळ बारामतीला नेले जाणार नाही," असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Rajya Sabha Election|6 जागांसाठी निवडणूक जाहीर, भाजपला दोन जागा जिंकण्याची संधी

राष्ट्रवादी पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील आपल्या भाषणात म्हणाले होते की, आपल्याकडील काही नेत्यांनी विरोध करायला नको होता. विमानतळ झाले असते तर खेडचा चेहरा मोहरा बदलला असता. आता ते विमानतळ बारामतीला होणार आहे. विमानतळ झाले असते तर आणखी विकास झाला असता, अनेकांनी हॉटेल्ससाठी जागा घेतल्या होत्या. अजित पवार यांना विनंती आहे की, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बारामतीला गेले त्याचा आनंद आहे. निदान डोमॅस्टिक विमानतळ इथे व्हावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.