12वी मेरीटबाबत मोठा निर्णय; सर्व परीक्षा ऑफलाईनच

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
Important News For Students
Important News For StudentsDainik Gomantak

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईनच (Exam Offline) होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी परीक्षांबाबत शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. कोरोनाचं संकट आता निवळलत चाललं आहे, त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षा यापुढे ऑफलाईनच होणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरोनामध्ये (Corona) सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं झाल्या आहेत. (All the exams will be held offline and Uday Samant has taken a big decision regarding the merit of 12th class)

Important News For Students
पिंपरी-चिंचवड: सर्वात मोठ्या बैलगाडी शर्यतीसाठी रेकॉर्ड टोकन, 2000 पेक्षा जास्त बैलगाडी मालक सहभागी होणार

शिक्षणही ऑनलाईनच सुरु होतं. आता शाळा आणि कॉलेज पूर्ण क्षमतेनं सुरु झाले आहेत, आणि त्यानंतरही काही विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. आता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार नसल्यानं विद्यार्थ्यांना (Student Exam) ऑफलाईन परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळ अपुरी पडू नये, यासाठी काही परीक्षांसाठी वेळ देखील वाढवून देण्यात आली होती. परीक्षेआधी प्रश्नपत्रिकाही देण्याचा प्रयत्न झाला. मात्र अखेरीस आता सर्व विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाईन होतील.

ऑफलाईनच…

वेगवेगळ्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा ऑफलाईन घेऊ नयेत, यासाठी आंदोलन देखील केलं होतं. सुरुवातीला या विद्यार्थ्यांची मागणी ग्राह्य धरत काही प्रमाणात ऑनलाईन सवलतीही परीक्षांमध्ये देण्यात आल्या होत्या. दरम्यान, आता सर्वच गोष्टी पूर्ण क्षमतेनं सुरु झाल्यानं परीक्षादेखील ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निकाल लवकर लागणार...

बारावीच्या परीक्षेबाबतही उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. शेवटच्या वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि निकाल लवकर लावावेत अशा सूचना विद्यापीठांना सामंतांकडून देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे बारावीचे विद्यार्थी हे अनेकदा सीईटी परीक्षेच्या स्पर्धेत बारावीच्या मुख्य अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष करतात असेही निदर्शनास आले.

Important News For Students
अनिल देशमुखांची तब्येत बिघडली; ICU मध्ये केले दाखल

याचा विचार करुन पुढच्या वर्षीपासून मेरटीसाठी बारावी आणि सीईटी असे प्रत्येकी पन्नास टक्के गुण ग्राह्य धरण्यात येणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री असताना त्यांनीही असाच निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मेरीटसाठी हीच पद्धत ग्राह्य धरण्यात येणार आहे.

येत्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 1 सप्टेंबरपासून करण्याचा प्रयत्न असल्याचीही माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे अनेक कॉलेजमध्ये मराठीतून अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. इंजिनिअरींगच्या मराठी अभ्यासक्रमाला विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत, अशी माहितीदेखील उदय सामंत यांनी यावेळी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com