महाराष्ट्रात सापडले अमेरिकन कासव

या अमेरिकन (American) कासवाला (Tortoise) वनविभागाकडे सुपूर्द केले जाईल. याबाबत येथील वनाधिकारी (Forest officer)म्हणाले की,या कासाव बाबात तज्ज्ञांशी चर्चा करून याला संग्रहालयात ठेवण्यात येईल.
महाराष्ट्रात सापडले अमेरिकन कासव
अमेरिकन कासवDainik Gomantak

महाराष्ट्रातील एका मच्छिमाराला ‘रेड इअर स्लाईडर’ (‘Red Ear Slider’) अमेरीकन जातीचे कासव सापडले आहे. अमिरिकन कासव हे भारतीय Indian कासवांपेक्षा वेगळे असल्याने तो आकर्षणाचा विषय बनला आहे. हे कासव वजनाने आणि आकाराने लहान आहे. या कासवाची रंगसंगती डोळ्यांचे पारणेच फेडणारी आहे. तसेच हे कासव अधिक आकर्षक दिसत आहे. हे कासव भारतीय नसल्याने, त्याला नदी,धरणात किंवा मोकळ्या जंगलात forest सोडल्यास इतर प्रजातींच्या कासवांना हे धोकादायक ठरु शकते असे मत काही कासव प्रेमी व अभ्यासकांना म्हटले आहे.

पुणे जिल्ह्यातील भीमा नदी Bhima River पात्रात मासेमारी Fishing करत असताना इतरांपेक्षा वेगळे असलेले कासव मच्छिमाराच्या जाळ्यात सापडले. विशेष म्हणजे येथील एका मच्छिमाराला गेल्या आठ वर्षांपूर्वी तब्बल दोनशे किलोहून 200 KG अधिक वजनाचे कासव सापडले होते.

अमेरिकन कासव
तब्बल दोन वर्षानंतर पांडुरंगाने दिले दर्शन

भारतात आले कसे अमेरिकन कासव: (American Turtle)

भारतात अमेरिकन कासव कसे आले याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हे कासव पाळण्याच्या दृष्टीने कोणीतरी आणले असावे आणि आता त्याला ते सोडून दिले असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या अमेरिकन कासवाला वनविभागाकडे सुपूर्द केले जाईल. याबाबत येथील वनाधिकारी म्हणाले की,या कासाव बाबात तज्ज्ञांशी Expert चर्चा करून याला संग्रहालयात museum ठेवण्यात येईल.

Related Stories

No stories found.