भोंगा वादात अमृता फडणवीसांची उडी; ठाकरे सरकारवर साधला निशाणा

ठाकरे सरकारवर शेलक्या शब्दात केली टीका
Amruta Fadnavis
Amruta FadnavisDainik Gomantak

मुंबई : गेले चार - पाच दिवस महाराष्ट्रात राजकिय वातावरण चांगलंच तापलं असून हनुमान चालीसा, मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन राज्यसरकार व विरोधी पक्ष म्हणजेच भाजपचे नेते मंडळी यांच्यात खडाजंगी सुरु आहे. शिवसैनिक व राणा दाम्यत्य यांच्यातील वाद याचाच एक भाग आहे. याच मुद्यावरुन अमृता फडणवीस यांनी भाष्य करत या वादात उडी घेतली आहे. (Amrita Fadnavis targets Thackeray government)

Amruta Fadnavis
मुंबईत गेल्या पाच दिवसांत कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 56 टक्क्यांनी वाढ

राज ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राज्यातील राज्यकर्ते हे भोगी असल्याचा टोला लगावला आहे. याच टीकेचा आधार घेत अमृता फडणवीस यांनी ट्विटरवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारला आणि अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. “ऐ ‘भोगी’ काहीतरी शिक आमच्या ‘योगीं’कडून”, असं ट्विट अमृता यांनी केलंय. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र हा हॅशटॅग वापरला आहे.

Amruta Fadnavis
वडापाव पडला महागात! घाटकोपर परिसरात 7 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

उत्तर प्रदेशमधील ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले आहेत. तर ३५ हजार धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी आवाजाची मर्यादा निश्चित करुन देण्यात आली आहे. मागील चार दिवसांमध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी ही कारवाई केली असल्याची माहिती राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी दिली. राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत भोंग्यांच्या आवाजासंदर्भात तातडीने कारवाई करण्यासंदर्भातील निर्देश जिल्हास्तरीय प्रशासनाला दिल्यानंतर राज्यात भोंग्याविरोधातील मोहीम सुरु करण्यात आलीय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी योगी आदित्य यांचे आभार मानत ; ठाकरे सरकावर खोचक शब्दात टीका करत “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच…नाही तर भोगी आहेत. असे म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com