एस टी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; अनिल परब

ST विलगीकरण हे 2-4 दिवसात होणारे नाही. यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागेल. याची कामगारांना (workers) जाणीव व्हावी.
Anil Parab
Anil ParabDainik Gomantak

महाराष्ट्र सरकारला (Government of Maharashtra) कोर्टाच्या (Court) आदेशाचे पालन करावे लागणार आहे. ST कर्मचाऱ्यांचे जवळपास सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.यामध्ये पगार वाढ बाबतची एकच मागणी सोडली तर सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. लोकांची गैरसोय करून संप करू नका. तसेच लोकांची गैरसोय टाळण्यासाठी संप मागे घेणे गरजेचे आहे. लोकांची गैरसोय मागे ठेऊन सरकार या चर्चा करण्यास तयार आहे. परंतु ही पद्धत नाही. कोर्टाने हा संप बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळे संप मागे घ्यावा. आम्ही कालही चर्चा करण्यास तयार होतो आणि आजही आहे.

पुढे बोलताना परब म्हणाले, सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) याना मी काल सर्व समजावून संगितले होते. परंतु ते बाहेर जाऊन वेगळेच बोलले. आज ते म्हणाले होते मी दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करतो. मी आजही माझ्या चर्चेची दारे खुले आहेत. परंतु त्यांच्या मनात काय आहे हे मला माहिती नाही.

Anil Parab
Goa: धनगर समाजाचा एस टी मागणीचा अहवाल दुरुस्तीसाठी सरकारकडे पुन्हा परत

तसेच, माझी कामगारांना विनंती आहे, हा संप चिघळू नये. यामध्ये ST चे नुकसान होणार आहे. आधीच ST तोट्यात आहे. अजून तोट्यात जाऊ देऊ नका.यामुळे कामगारांचे स्वतःचेच नुकसान होईल. आणि म्हणून ST चे नुकसान होऊ देऊ नका. आपण सगळे मिळून याच्यातून नक्की मार्ग काढूया. असे मी आवाहन करतोय. परंतु कामगारांनी राजकारणाला बळी पडू नये.

पुढे बोलतांना परब म्हणाले, ST विलगीकरण हे 2-4 दिवसात होणारे नाही. यासाठी पूर्ण अभ्यास करावा लागेल. याची कामगारांना जाणीव व्हावी. नेत्यांनी कामगारांना समजावून सांगणे गरजेचे आहे. उलट नेते कामगारांना भडकवत आहेत. याच्या मध्ये कर्मचाऱ्यांचेच नुकसान होत आहे. ST विलगीकरणासाठी कोर्टाने याबाबत समिती नेमली आहे. याचे काम सुरु आहे.

दरम्यान, एक दुर्दैवी घटना सांगली येथे काल पासून संपात सहभागी असलेले एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com