अनिल परब यांच्या अडचणीत वाढ; अनधिकृत बांधकामाची होणार चौकशी

anil parab.jpg
anil parab.jpg

भाजप खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी साई रिसोर्टच्या (Sai Resort) अनधिकृत बांधकामबाबत केलेल्या तक्रारीवरुन नक्की वस्तुस्थिती काय आहे याची खातरजमा करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड (Indurani Jakhar) तसेच दापाोली प्रांताधिकारी हे या प्रकरणाची चौकशी करत असून त्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे साई रिसोर्ट असल्याचा आरोप करण्यात येत आहे. (Anil Parabs difficulty increases Unauthorized construction will be investigated)

भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी दापोलीमधील साई रिसोर्टबाबत लेखी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. मुरुड तालुका दापोली येथील गट क्रमांक 446 येथील साई रिसोर्टचे बांधकाम अनधिकृत आहे. सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच दस्तावेजात फेरफार, फसवणूक त्याचबरोबर मंत्री अनिल परब यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले,असे मुद्दे सोमय्या यांनी मांडले आहेत.   

सोमय्या यांनी याबाबतची लेखी तक्रार रत्नागिरीच्या  जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्या अनुषंगाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी मुरुड येथील साई रिसॉर्टचे बांधकाम बिगर शेती परवाना, घरपट्टी, रस्ता यांबाबत नियमांचे उल्लंघन करुन केले आहे यायबाबतची वस्तुस्थिती तपासण्यात येणार आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि उपविभागीय अधिकारी दापोली यांना या प्रकरणासंबंधी चौकशी अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाचा चौकशी अहवाल समितीने जिल्हा प्रशासनाला पाठवायचा आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com