दहावी बारावीच्या परिक्षांच्या तारखा जाहीर

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 21 जानेवारी 2021

राज्यातील दहावी बारावीच्या परिक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मुंबई:  राज्यातील दहावी बारावीच्या परिक्षांची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड य़ांनी केली आहे. दहावीच्या परिक्षा 29 एप्रील ते  31 2021 दरम्यान होणार आहेत तर बारावीच्या परिक्षा या 23 एप्रील 29 मे या कालावधी दरम्यान घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. बारावीचा निकाल हा जुलौ महिना संपण्याआगोदर लावण्याचा मंडळाचा विचार असून तर दहावीचा निकाल हा ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी लावले जातील असे वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

सध्या मुंबई, ठाणे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग चालू झाले आहेत. त्यानुसार आता सगळ्या परिस्थितीचा आढावा घेवून शाळा सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल.राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाची स्थिती लक्षात घेवून तसेच राज्याच्या सार्वजनिक विभागाशी चर्चा करुन शाळा सुरु करण्याचे निर्णय घेतले जातील असेही त्यांनी सांगितले.

दरवर्षी साधारण दहावी, बारावीच्या परिक्षा या फेब्रुवारी, मार्च महिन्यांत परिक्षा पार पडतात मात्र यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वेळापत्रक कोलमडल्यामुळे शैक्षणिक वर्ष सुरुळीत पध्दतीने सुरु करण्याचे प्रयत्न शालेय विभागातर्फे करण्यात येत आहेत.   

संबंधित बातम्या