महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये आणखी 15 दिवसांची वाढ? 

महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये आणखी 15 दिवसांची वाढ? 
maharashtra lockdaun.jpg

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊननंतरही कोरोनाचे संक्रमण थांबण्याचे कोणतेही चिन्ह अद्याप तरी दिसत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्यसरकार 1 ते 15 मे या कालावधीत लॉकडाउनसारख्या निर्बंधांची अंमलबजावणी वाढवू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा आपल्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. मुंबईत नवीन प्रकरणांचा वेग कमी आहे, परंतु राज्याच्या इतर भागात  वेगाने संक्रमण होत आहे.  मुंबई वगळता नागपूर, पुणे, ठाणे आणि औरंगाबादमध्येही सतत नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.  (Another 15 days increase in lockdown in Maharashtra?) 

दरम्यान, राज्यात लॉकडाऊनचे निर्बंध लागू केल्यापासून मुंबईमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र राज्यातीलइतर भागात संक्रमण अद्याप वेगाने होत आहे. आताही विदर्भ, मराठवाडा आणि इतर भागांमध्ये कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. त्यामुलेराज्यातील इतर भागातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत टाळेबंदीच्या मुदतवाढीबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही विजय वडेट्टीवार यांनी यांनी म्हटले आहे. तर, कोरोना प्रकरणे व निर्बंधाचा राज्य सरकारकडून आढावा घेतला जात आहे.  कोरोना प्रकरणांच्या वेगामध्ये फार मोठी घसरण झाली नाही. अशा परिस्थितीत,  लागू केलेले निर्बंध एकाच वेळी हटवले जाणार नाहीत.  परिस्थिती पाहता निर्बंध हळूहळू काढले जातील.

तसेच, दररोज नवीन प्रकरणांची संख्या 35 ते 40 हजारांवर येत नाही तोपर्यंत राज्यात निर्बंध शिथिल केले जाणार नाहीत. मात्र राज्यात लॉकडाऊन दरम्यान लसीकरणाची मोहीम अधिक वेगाने राबवली जाईल. येत्या काही दिवसांत लसीकरण आणि निर्बंधांमुळे राज्यात कोरोना साखळी खंडित होण्यास मदत होऊ शकेल," असेही  या अधिकाऱ्याने सांगितले आहे.  दारम्यान, राज्य सरकारने 14 एप्रिल ते 1 मे या कालावधीत कडक निर्बंध जाहीर केले होते. याशिवाय जिल्ह्याबाहेरील किंवा एका शहरातून दुसर्‍या शहरात जाण्यासही बंदी होती. अशा कोणत्याही हालचालींसाठी ई-पास अनिवार्य करण्यात आला आहे.

तथापि, राज्यात निर्बंध कडक लागू केल्यानंतरही रुग्णसंख्या कमी झाली नाही. मात्र गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून दररोज ६६ ते ६८ हजार नव्या रुग्णांची नोंद हॉट होती. मात्र देलया दोन दिवसात हा आकडा ४८ हजारांपर्यंत आकडा खाली आला.  मुंबई व पुणे या प्रमुख शहरांत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याकजे दिसत आहे. दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी एकाच दिवशी  ७१ हजारांवर रुग्ण करोनामुक्त झाले. या सर्व बाबींचा विचार करता आजच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होणार आहे.  राज्यात लॉकडाऊनचे लावल्याचे चांगले परिणाम दिसून येत असल्याने आणखी एक- दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊनचे निर्बंध कायम ठेवल्यास  रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते. असे दिसत आहे. त्यामुळे  राज्यात आणखी काही लॉकडाऊन वाढवला जावू शकतो, असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com