सचिन वाझे यांचा अनिल देशमुखांवर आणखी एक लेटर बॉम्ब

दैनिक गोमंतक
बुधवार, 7 एप्रिल 2021

अँटिलीया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांच्या  एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान, सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने वाजे यांना  9 एप्रिलपर्यंत रिमांडवर पाठवले आहे.

अँटिलीया स्फोटक प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांच्या  एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या चौकशी दरम्यान, सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केल्याची माहिती समोर आली आहे. एनआयएच्या विशेष कोर्टाने वाजे यांना  9 एप्रिलपर्यंत रिमांडवर पाठवले आहे. या कालावधीत कोर्टाने सीबीआयलाही वाजे यांची चौकशी करण्याची परवानगीही दिली आहे. याच चौकशीदरम्यान सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे. (Another serious allegation made by Sachin Waze against Anil Deshmukh) 

कोरोनाच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे मोठी मागणी

काय म्हणाले सचिन वाझे ? 
सचिन वाजे यांना 2020  मध्ये त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू करण्यात आले. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सचिन वाझे यांनी  पुन्हा नोकरीवर रुजू करणे मान्य नव्हते. परंतु तत्कालीन गृहमंत्री अनिल परब यांनी ते शरद पवार यांची याबाबत समजूत काढतील, असे त्यांना  सांगितले.  मात्र त्या बदल्यात अनिल परब  यांनी सचिन वाझे यांच्याकडे दोन कोटी रुपयांची मागणी होती. मात्र इतकी मोठी रक्कम भरण्यास असमर्थ असल्याचे सचिन वाझे यांनी सांगितले.  त्यावर अनिल देशमुखांनी नंतर पैसे नंतर देण्यास सांगितले.

त्यानंतर  ऑक्टोबर 2020 मध्ये अनिल देशमुख यांनी मला सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये बोलावले आणि शहरातील 1650  बार आणि रेस्टॉरंट्समधून पैसे गोळा करण्यास सांगितले.  त्यावेळी देखील मी त्यांना याबाबत असमर्थ असल्याचे सांगत स्पष्ट नकार दिल्याचे सचिन वाझे यांनी यावेळी नमूद केले. त्यानंतर जुलै ते ऑगस्ट 2020 मध्ये अनिल परब यांनी पुन्हा मला त्यांच्या बंगल्यावर बोलवले होते. याच आठवड्यात 3-4 दिवसांत डीसीपीच्या अंतर्गत बदल्यांमध्ये फेरबदल होणार होते.  या वेळी अनिल देशमुख यांनी माझ्याकडफे  सैफी बुरहानी अपलिफ्टमेंट ट्रस्टकडून (एसबीटी)  50 कोटी वसूलीच्या मागणीचा आग्रह केला. मात्र मला एसबीयूटीबद्दल काहीच माहिती नसल्याने मी अशी कोणतीही कामे करण्यास  नकार दिला, असेही यावेळी सचिन वाझे यांनी सांगितले. 

सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिल पर्यंत वाढ  

जानेवारी 2021 मध्ये मंत्री अनिल परब यांनी वाझे यांना पुन्हा  त्यांच्या अधिकृत बंगल्यावर बोलावले आणि बीएमसीमध्ये सूचीबद्ध असलेल्या काही कंत्राटदारांविरूद्ध चौकशी करण्यास सांगितले. अशा तसेच अशा 50 कंत्राटदारांकडून किमान दोन कोटी रुपये घेण्याची मागणी त्यांनी माझ्याकडे केली, असेही सचिन वाझे यांनी यवेळी सांगितले. 

जानेवारी 2021 मध्ये अनिल देशमुख यांनी मला पुन्हा त्यांच्या अधिकृत बंगल्यावर भेटण्यासाठी बोलावले. यावेळी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन देखील तेथे उपस्थित होते. अनिल देशमुख यांनी मला  शहरातील  1650 बार आणि रेस्टॉरंटमधून 3- 3.50 लाख रुयपे जमविण्यास  सांगितले, अशी माहिती सचिन वाजे यांनी दिली. 

यानंतर मी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्यतकडे  याबाबत माझे मत स्पष्ट केले.  नजीकच्या काळात मी काही खोट्या वादात अडकेल, अशी शंका त्यांच्यापुढे उपस्थित  केली होती. त्यावेळी सीपी यांनी मला  प्रोत्साहित केले आणि आपण कोणासाठीही अवैध प्रकारची वसूली न करण्याबाबत सांगितले, असेही यावेळी सचिन वाजे यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या