राजकारणात काहीही होऊ शकतं;प्रवीण दरेकरांच सूचक व्यक्तव्य

परळीमध्ये फटाके फोडून मंत्रांचे केले स्वागत. आणि शेतकऱ्यांची मात्र लावली चेष्टा असे वक्तव्य दरेकरांनी केले.
राजकारणात काहीही होऊ शकतं;प्रवीण दरेकरांच सूचक व्यक्तव्य
Praveen Darekar Dainik Gomantak

महाराष्ट्र: राज्यात अति मुसळधार पाऊस (Rain)झाला आहे. महाराष्ट्रातील बळीराज्याचे (Farmer)मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून अद्याप पर्यंत मदत जाहीर झाली नाही. वडेट्टीवार (Vadettiwar) यांनी दोन दिवसात शेतकऱ्यांना मदत करू असे जाहीरपणे सांगितले होते. पण त्याची मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अति मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले, सद्या एका बाजूला शेतकरी संकटात आहेत, आणि परळीमध्ये फटाके (Firecrackers)फोडून मंत्र्यांचे स्वागत केले जाते. आणि त्रस्त शेतकऱ्यांची चेष्टा केली जात आहे. असे वक्तव्य दरेकरांनी केले आहे.

Praveen Darekar
संकटाच्या काळात राजकारण करू नका; नितीन गडकारींचा पक्षनेत्यांना घरचा आहेर  

भाजप-मनसे युती होणार का?

भाजप मनसे यांच्या युतीबाबत दरेकर म्हणाले, राजकारणामध्ये (Politics)ज्या दिवशी उध्दव ठाकरे काँगेसबरोबर गेले, त्यांनी त्या दिवशी हिंदुत्ववाची नाळ तोडली आहे. छगन भुजबळांनी बाळासाहेब ठाकरेंना (Balasaheb Thackeray)तुरुंगात टाकले होते. आणि त्यांचे पुत्र काँग्रेस सोबत एकत्र आहेत. या वरून माझ्या सारख्या कार्यकर्त्याचा समज आहे की, राजकारणात कधीही आणि काहीही होऊ शकते. परंतु आता पर्यंत मनसे-भाजप युती असा कोणताही निर्णय झाला नाही. त्या त्या पक्षातील वरिष्ठ त्याचा निर्णय घेतील.

नगरसेवकांचे काम रात्र-दिवस:

संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. आणि त्यास प्रतिउत्तर देत दरेकर म्हणाले, 'निवडणुकीच्या आधी लक्ष देऊन काही होत नसतं, आमचे नगरसेवक(Corporator) 5 वर्षांपासून दिवस रात्र काम करत आहेत. पुणेकरांना विकास पाहिजे आणि तो फक्त आम्हीच देऊ शकतो.तसेच तीन सदस्यीय प्रभागाचा भाजपला मोठा फायदा होणार, असा विश्वास दरेकरांना व्यक्त केला.

Related Stories

No stories found.